आपलाही चेहरा कोरियन मुलींसारखा स्वच्छ, चमकदार दिसावा यासाठी त्यासाठी काय साहित्य लागतं आणि त्याचा वापर कसा करायचा समजून घेऊया. कोरियन स्किन केअरमधे सर्वात जास्त वापर होतो तांदळाच्या पाण्याचा.
तांदळाचं पाणी - कोरियन मुलींच्या चमकदार त्वचेचं रहस्य म्हणजे तांदळाचे पाणी. तांदळाचे पाणी घरी बनवता येते. रात्रभर तांदूळ पाण्यात भिजवा. सकाळी या पाण्यानं चेहरा धुवा. तांदळाचं पाणी दररोज करता येतं. तांदळाच्या पाण्यानं चेहरा धुण्यानं रंग उजळतो, डाग आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते आणि चेहरा हायड्रेटेड राहतो.
advertisement
Vomiting : उलट्या, मळमळ का होते ? आयुर्वेदिक उपचारांनी करता येईल मात
बार्ली टी - कोरियन लोक चहाऐवजी बार्ली टी पसंत करतात. त्यातल्या फायबरमुळे त्वचेला सुरकुत्या कमी येतात आणि त्वचेला चमक येते.
चेहऱ्याची स्वच्छता - कोमट पाण्यात एक मऊ कापड भिजवा आणि ते चांगलं पिळून घ्या. त्वचेवरील घाण काढून टाकण्यासाठी त्या कापडानं चेहरा आणि मान हळूवारपणे पुसा. कोरियन मुली दहा सेकंदांची युक्ती वापरतात. ही युक्ती म्हणजे चेहरा धुतल्यानंतर दहा सेकंदांच्या आत त्यावर टोनर लावणं, जेणेकरून चेहरा कोरडा होऊ नये.
Hyper Acidity : हायपर ॲसिडिटी का होते? आयुर्वेदिक उपचारांनी हा त्रास कमी होतो?
ग्रीन टी - ग्रीन टीचे औषधी गुणधर्म त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. ग्रीन टी एक कप पाण्यात उकळवा आणि थंड झाल्यावर या पाण्यानं चेहरा धुवा.
कोरियन फेस मास्क - कोरियन फेस मास्क भातापासून बनवला जातो. या मास्कमुळे चेहरा उजळतोच पण मृत त्वचा देखील काढून टाकली जाते. तांदळाचं पीठ कोरफडीच्या रसात मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावा. पंधरा मिनिटं ते वाळू द्या आणि नंतर चेहरा धुवा.
