TRENDING:

Six Pack पाहिजे? Gym सोबत फॉलो करा या टिप्स, मुली Body बघून बोलतील Wow...

Last Updated:

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम अत्यंत महत्त्वाचा असतो. दररोज जिमला जाणाऱ्यांनी त्यात खंड पडू देऊ नये. परंतु जिम करताना काही नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सौरभ तिवारी, प्रतिनिधी
जिमला जाण्यापूर्वी आणि जिमवरून आल्यानंतर काहीतरी खाणं आवश्यक असतं.
जिमला जाण्यापूर्वी आणि जिमवरून आल्यानंतर काहीतरी खाणं आवश्यक असतं.
advertisement

विलासपूर : आजकाल जवळपास सर्वजण जिमला जातात. ज्यांना शक्य नसतं ते अर्धा तास का होईना पण चालतात. कारण सध्या आपलं जीवन इतकं धावपळीचं झालंय की त्यात जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा पाळणं अवघड झालंय. त्यामुळे मिळेल तितका वेळ व्यायाम करणं आवश्यक आहे. परंतु त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम अत्यंत महत्त्वाचा असतो. दररोज जिमला जाणाऱ्यांनी त्यात खंड पडू देऊ नये. परंतु जिम करताना काही नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण योग्य पद्धतीने जिम केलं, तर आपलं केवळ वजन नियंत्रणात राहत नाही, तर शरीर आणि मन दोन्ही सुदृढ राहतं. शिवाय फिट राहण्यासाठी व्यायाम जितका महत्त्वाचा असतो, तितकाच महत्त्वाचा असतो आहार.

advertisement

वातावरण बदलताच पडता आजारी? असं कधीपर्यंत चालणार, आता 'या' 3 सवयी लावून घ्याच!

काय खावं, काय खाऊ नये?

जिमला जाण्यापूर्वी आणि जिमवरून आल्यानंतर काहीतरी खाणं गरजेचं असतं. परंतु नेमकं काय खावं, याबाबत अनेकजणांच्या मनात गोंधळ असतो. आज आपण पाहूया, असे कोणते पदार्थ खायला हवे ज्यामुळे व्यायाम अगदी व्यवस्थित होईल आणि जिमनंतर थकलेलं शरीर छान ऊर्जावान राहील.

advertisement

विशीतच झालात अंकल, आंटी? पांढरे केस लपवता कसले, करा 'हे' 5 उपाय

डायटिशियन आणि हेल्थ एक्स्पर्ट अभिमन्यू सांगतात की, फिट राहण्यासाठी शरिरात पदार्थांपेक्षा पेय जाणं महत्त्वाचं असतं. परंतु ड्रिंकसोबत काही खाल्लं नाही, तर थकवा येतो. त्यामुळे हेल्थी मिल घ्यावा. जसं की, ऑरेंज ओट मिल, मिल्की ड्रायफ्रूट मिल, पोटॅटो कर्ड, पीनट बटर ब्रेड, इत्यादींपैकी आपण खाऊ शकता. हे पदार्थ चवीला स्वादिष्ट असतात आणि त्यातून शरिराला ऊर्जाही मिळते. जिम करण्यापूर्वी आपण ते खाऊ शकता. व्यायामाच्या जवळपास 30 ते 40 मिनिटांआधी pre workout meal घ्यावं. परंतु व्यायामाच्या अगदीच काही मिनिटांपूर्वी काहीच खाऊ नये.

advertisement

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Six Pack पाहिजे? Gym सोबत फॉलो करा या टिप्स, मुली Body बघून बोलतील Wow...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल