वातावरण बदलताच पडता आजारी? असं कधीपर्यंत चालणार, आता 'या' 3 सवयी लावून घ्याच!

Last Updated:

ऋतू बदलताच सर्दी, खोकला, ताप असे साथीचे आजार जडायला सुरूवात होते. एकदा ते दिवस सवयीचे झाले की, मग आपलं जगणं सामान्य होतं, मात्र तोपर्यंत मागे डॉक्टरच्या वाऱ्या लागतात.

ज्यांना दही खायला आवडतं, त्यांनी एकच काम करावं.
ज्यांना दही खायला आवडतं, त्यांनी एकच काम करावं.
सनंदन उपाध्याय, प्रतिनिधी
बलिया : प्रत्येक ऋतूला आपल्या जीवनात अत्यंत महत्त्व आहे. परंतु ऋतू बदलताच वाऱ्यांचा वेग आणि हवामानही बदलतं, त्यामुळे या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. कारण वातावरणातील बदल हा अनेकजणांना सहन होत नाही. एकदा ते दिवस सवयीचे झाले की, मग आपलं जगणं सामान्य होतं, मात्र तोपर्यंत मागे डॉक्टरच्या वाऱ्या लागतात. आता त्या कमी कशा होणार, तर त्यासाठी प्रत्येकाने रोजच्या जगण्यात काही चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्या.
advertisement
डॉक्टर प्रियंका सिंह सांगतात की, पचायला जड असे अन्नपदार्थ आपल्या जेवणातून वगळावे. ऋतू बदलताच सर्दी, खोकला, ताप असे साथीचे आजार जडायला सुरूवात होते. त्यामुळे आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी. 'योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम' हाच आरोग्यदायी जीवनाचा मंत्र आहे.
advertisement
दही खायचं असेल तर...
ज्यांना दही खायला आवडतं, त्यांनी एकच काम करावं. दह्यामध्ये काळीमिरी आणि काळं मीठ घालावं. परंतु चुकूनही साखर घालून दही खाऊ नका. हवं तर आवळा घातलेलं दही खाऊ शकता. शिवाय आईस्क्रीम किंवा कोणताही थंड ज्यूस पिणं टाळावं. तसंच तुम्हाला जास्त वेळ व्यायाम करणं शक्य नसेल, तर निदान अर्थ तास का होईना पण चाला.
advertisement
नेमकं कधी चालावं?
आयुर्वेदानुसार, सूर्योदयापूर्वी चालणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. शिवाय दररोज मोहरीचं तेल कोमट तापवून त्याने शरिराला मालिश करा आणि मग कोमट पाण्याने आंघोळ करा. दिवसभरात झोपू नका, त्यामुळे शरिरात आळस संचारेल. त्याउलट रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठा. त्यामुळे दिवसभर शरीर छान ऊर्जावान राहील.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
वातावरण बदलताच पडता आजारी? असं कधीपर्यंत चालणार, आता 'या' 3 सवयी लावून घ्याच!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement