वाहतुकीचा नवीन मार्ग
सुट्ट्यांच्या दिवशी कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली होती. ही कोंडी टाळण्यासाठी साताऱ्याकडून कास पठार आणि बामणोलीकडे जाणारी वाहने कास पठार आणि कास धरणावरून बामणोलीकडे जातील.
परत येण्याचा मार्ग
बामणोली आणि कास धरणाकडून साताऱ्याकडे येताना वाहनांना वेगळा मार्ग वापरावा लागणार आहे. ही वाहने बामणोली-कास धरणाच्या बाजुने घाटाई देवी मंदिर-घाटाई फाटा मार्गे साताऱ्याकडे परत येतील. या काळात वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही.
advertisement
बामणोलीकडे जाताना असे जा...
- सातारा-घाटाई फाटा-कास पठार-कास तलाव-बामणोली
परत माघारी येण्याचा मार्ग...
- बामणोली-कास धरण भिंत-वांजळवाडी-घाटाई देवी मंदिर-घाटाई फाटा-सातारा
हे ही वाचा : सात गुंठ्यातच शेतकऱ्याची कमाल, केली कांद्याची लागवड; लाखोंचा मिळणार नफा!
हे ही वाचा : महाराष्ट्रात नामांतराचा धडाका सुरूच, शहरांनंतर आता महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचंही नाव बदललं!