रांची : विमानात प्रवास करणे अनेकांचे स्वप्न असते. कारण रेल्वेने 24 ते 36 तासांचा प्रवास हा विमानाने फक्त 2 ते 3 तासात पूर्ण होतो. पण विमानाचे तिकिट महाग असल्याने अनेक जणांना इच्छा असूनही विमानाच प्रवास करता येत नाही. तर काही जण महाग तिकीट काढून प्रवास करतात. फ्लेक्सी फेअरमुळे अनेकदा तिकिट महाग होते आणि सर्वसामान्य माणसाला विमानप्रवास शक्यच होत नाही.
advertisement
पण तुम्ही जर काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला विमानाचे स्वस्त तिकिट मिळू शकते. झारखंड येथील रांचीच्या स्कायलाइनचे डायरेक्टर आणि एव्हिएशन एक्सपर्ट संजीत कुमार यांनी लोकल18 शी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली, तर तुम्हाला विमानाचे स्वस्त तिकिट मिळून जाईल. अनेकदा लोक माहिती नसल्याने महाग तिकिट घेतात. पण तुम्ही विमान तिकिट कमी रुपयात बुक करुन आपले पैसे वाचवू शकतात.
संजीत कुमार हे सांगतात की, तिकीट बुक करताना तीन महिन्यांआधी बुक करावे. 3 महिन्यांपासूनच विमान कंपन्या तिकिट बुकिंग सुरू करतात. त्यामुळे तुम्ही तीन चार महिन्यांपूर्वी ट्रिप प्लान करुन लगेच तिकीट बुक करुन घ्यावे. तुम्ही पाहाल की जे तिकीट ऐनवेळी 15 हजार रुपयांचे होते, ते 3 महिन्यांपूर्वी 6 ते 7 हजार रुपयांत मिळेल.
पेंटरच्या मुलाची क्रिकेटमध्ये धमाल! बेस प्राइसपेक्षा 8 पट जास्त लागली बोली, कोण आहे हा क्रिकेटर?
याशिवाय एक आठवड्याआधी जरी जायचे असेल तर सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी तिकिट बुक करण्याचा प्रयत्न करावा. कारण, हे तीन दिवस खूप अफेक्टिंग वर्किंग डे असतात. इतर दिवस किंवा वीकेंडच्या तुलनेत तिकीटांसाठीची गर्दी खूपच कमी असते. यामुळे तुम्हाला तीन-चार हजारांचा फरक सहज मिळेल.
पुढे ते म्हणाले की, त्याच एअरलाईन्सने सतत प्रवास करण्याचा प्रयत्न करा. याद्वारे तुम्हाला अनेक क्रेडिट्स मिळतील आणि त्या क्रेडिट्स जमा करून तुम्ही एका तिकिटावर 3-4 हजार रुपये वाचवू शकता. याशिवाय शनिवार, रविवार किंवा शुक्रवारी चुकूनही तिकीट बुक करू नका. कारण हे वीकेंड्स आहेत आणि तिकीटांसाठी खूप स्पर्धा असते. अशावेळी एअरलाइन्सही तिकिटाचे दर दुप्पट करतात. त्यामुळे खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.