या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते नागपूर दरम्यान 6 विशेष गाड्या, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मडगाव दरम्यान 4 गाड्या, सीएसएमटी ते कोल्हापूर दरम्यान 2 गाड्या आणि पुणे ते नागपूर दरम्यान 6 विशेष गाड्या धावतील. या गाड्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी बुकिंग ओपन केले जाणार आहे.
Ganeshotsav 2025: गावाक जायचं कसं रे बाप्पा? काही मिनिटांतच 44 ट्रेन फुल! गणेशभक्तांची तिकिट कोंडी सुरूच
advertisement
विशेष ट्रेन आणि त्यांचे क्रमांक
सीएसएमटी ते नागपूर 01123
नागपूर ते सीएसएमटी 01124
सीएसएमटी ते नागपूर 02139
नागपूर ते सीएसएमटी 02140
सीएसएमटी ते कोल्हापूर 01417
कोल्हापूर ते नागपूर 01418
एलटीटी ते मडगाव 01125
मडगाव ते नागपूर 01126
एलटीटी ते मडगाव 01127
मडगाव ते एलटीटी 01128
पुणे ते नागपूर 01469
नागपूर ते पुणे 01470
पुणे ते नागपूर 01439
नागपूर ते पुणे 01440
गणेशोत्सवासाठी देखील रेल्वेची विशेष सेवा
सर्वांचा आवडता गणेशोत्सव देखील काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विशषत: कोकणचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईसह उपनगरांतून लाखो चाकरमानी कोकणात जातात. त्यासाठी दरवर्षी रेल्वेकडून विशेष तयारी केली जाते. यंदा देखील मध्य रेल्वेने 250 गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. याबाबत मध्य रेल्वेने अधिकृत घोषणा केली असून गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.