TRENDING:

रेल्वेत तुमची वस्तू विसरलीय काय? लॅपटाॅप, मोबाईल, पैसे... या मौल्यवान वस्तू परत मिळणार, जाणून घ्या ‘ऑपरेशन अमानत’

Last Updated:

मध्य रेल्वेच्या ऑपरेशन अमानतअंतर्गत 2024 मध्ये प्रवाशांच्या विसरलेल्या 1491 वस्तू परत मिळाल्या. यांची एकूण किंमत 5.22 कोटी रुपये होती. मुंबई विभागात सर्वाधिक 649 वस्तू सापडल्या, ज्यांची किंमत 2.55 कोटी होती. ऑपरेशन अमानतने अनेक प्रवाशांना त्यांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित परत मिळवून दिल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतीय रेल्वेने विसरलेल्या वस्तू परत करण्यासाठी ‘ऑपरेशन अमानत’ सुरू केले आहे. याअंतर्गत प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तू, जसे की मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोकड आदींचा शोध घेऊन परत दिले जाते. महाराष्ट्रातील मध्य रेल्वे विभागाला यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर 2024 दरम्यान तब्बल 1491 वस्तू सापडल्या आहेत. त्याची किंमत 5.22 कोटी रुपये आहे.
AI Image
AI Image
advertisement

मध्य रेल्वेच्या पाच विभागांपैकी मुंबई विभागात सर्वाधिक वस्तू विसरण्यात आल्या आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत मुंबई विभागात 649 वस्तू सापडल्या असून त्यांची किंमत 2.55 कोटी रुपये आहे.

  • भुसावळ विभाग : 261 वस्तू (1.07 कोटी)
  • नागपूर विभाग : 322 वस्तू (67.89 लाख)
  • सोलापूर विभाग : 88 वस्तू (51.86 लाख)
  • advertisement

  • पुणे विभाग : 171 वस्तू (39.73 लाख)

नोव्हेंबर 2024 मध्ये एकट्या 157 वस्तू परत करण्यात आल्या आहेत, ज्यांची किंमत 43.72 लाख रुपये होती. विसरलेल्या वस्तूंमध्ये लॅपटॉप्सचे प्रमाण जास्त आहे. प्रवाशांनी विसरलेली रोख रक्कम, मोबाईल्स, पर्सेसही परत मिळाली. ऑपरेशन अमानतने अनेक प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू परत केलेल्या आहेत.

हे ही वाचा : लवकरच EVM विरोधात जनआंदोलन, सुरुवात मारकडवाडीपासून करु, पटोलेंची घोषणा

advertisement

हे ही वाचा : Motorola चा जबरदस्त फोन फक्त 9,999 रुपयांत! फीचर्सपाहून तुम्हीही म्हणाल Wow

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
रेल्वेत तुमची वस्तू विसरलीय काय? लॅपटाॅप, मोबाईल, पैसे... या मौल्यवान वस्तू परत मिळणार, जाणून घ्या ‘ऑपरेशन अमानत’
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल