लखनऊ, 21 डिसेंबर : नवीन वर्षामध्ये अनेक जण आपल्या कुटुंबासोबत फिरायला ट्रिपवर जातात. जर तुम्हीही आपल्या कुटुंबामध्ये तुम्ही कुटुंबासोबत कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर IRCTC पॅकेज तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
महाराष्ट्राच्या बाहेर शिलाँग, चेरापुंजी, काझीरंगा आणि गुवाहाटीला भेट देण्यासाठी IRCTC च्या प्रादेशिक कार्यालयाकडून हवाई टूर पॅकेज दिले जात आहे. हे दिनांक 12.01 2024 ते 18.01.2024 पर्यंत असेल. यामध्ये 07 दिवस आणि 06 रात्रीचा प्रवासाचा यामध्ये समावेश असेल
advertisement
या ट्रिपमध्ये लोकांना लखनऊ ते गुवाहाटी विमानाने प्रवास करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच थ्री स्टार हॉटेलमध्ये जेवण आणि राहण्याची व्यवस्था आहे. यासोबतच चेरापुंजी येथील मोस्माई गुहा, ०7 सिस्टर वॉटर फॉल्स, नोहकालिकाई वॉटर फॉल्स आणि एलिफंटा वॉटर फॉल्स, शिलाँग येथील आशियातील सर्वात स्वच्छ गाव मावलिनाँगचे लिव्हिंग रूट ब्रिज भ्रमंती, डॉन वास्को म्युझियम, उमियम लेक, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, गुवाहाटी येथील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कामाख्या देवीचे दर्शन, आणि स्थानिक ठिकाणी भ्रमंती केली जाईल.
काय आहे किंमत -
या हवाई यात्रा पॅकेजमध्ये जाणे आणि येण्याचे विमान प्रवास, थ्री स्टार हॉटेलमध्ये राहायची व्यवस्था आणि जेवणासाठी ब्रेकफास्ट आणि डिनरची व्यवस्था आयआरसीटीसीच्या वतीने केली जाईल. तीन व्यक्ती एकत्र राहण्यासाठी पॅकेजची किंमत 39 हजार 900 रुपये/- प्रति व्यक्ती आहे. दोन व्यक्ती एकत्र राहण्यासाठी पॅकेजची किंमत 43 हजार रुपये प्रति व्यक्ती आहे. एकट्यासाठी मुक्कामाच्या पॅकेजची किंमत 61 हजार 100 रुपये/- प्रति व्यक्ती आहे. प्रत्येक मुलासाठी जर पालकांसोबत राहात असेल तर पॅकेजची किंमत 34 हजार 600 रुपये /- (बेडसह) आणि 25 हजार 800 रुपये /- (बेडशिवाय) प्रति व्यक्ती आहे.
अशी कराल बुकिंग -
पर्यटन भवन, गोमती नगर, लखनऊ येथील आयआरसीटीसी कार्यालयाशी संपर्क करावा आणि आयआरसीटीसीची वेबसाइट www.irctctourism.com वरुन ऑनलाइन बुकिंग केली जाऊ शकते. अधिक माहितीसाठी आणइ बुकिंगसाठी खाली दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क करू शकतात.
लखनऊ- 8287930911/8287930902
कानपुर-8287930930, 8287930927