हिमालय पर्वतरांगा त्यांच्या अद्वितीय सौंदर्यासाठी आणि जैवविविधतेसाठी ओळखल्या जातात. या पर्वतरांगा परिसरातील हवामानावर परिणाम करतात आणि अनेक नद्यांचं उगमस्थान आहेत. शिवाय, या प्रदेशात वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती आढळतात, ज्यामुळे हा भाग निसर्गप्रेमी आणि संशोधकांसाठी महत्त्वाचा ठरतो.
हे ही वाचा : स्वस्त रिचार्जसाठी सिम पोर्ट करताय? मग या 3 गोष्टी तुम्हाला माहिती हव्याच
advertisement
भारतामध्ये 28 राज्यं आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्याला स्वतंत्र सरकार आहे, तर केंद्रशासित प्रदेश थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतात. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल ही मोठी आणि लोकसंख्येने जास्त असलेली राज्यं आहेत. दुसरीकडे, दिल्ली आणि चंदीगडसारखे केंद्रशासित प्रदेश लहान आहेत. भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पद्धतीनुसार भारताचे हे भाग विभागले गेले आहेत.
हिमाचल प्रदेशला 'पर्वतराज्य' किंवा 'माउंटन स्टेट' म्हणून ओळखलं जातं. या राज्यात धौलाधार पर्वतरांगा आहेत, ज्या रावी आणि बियास नद्यांमध्ये विभागल्या जातात. जवळपास 16,807 गावं या राज्यात आहेत, ज्यापैकी बहुतांश गावं डोंगराळ आणि दरींच्या प्रदेशात वसलेली आहेत.
हे ही वाचा : Men’s day wishes : तुमचं आयुष्य सुंदर करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला नक्की पाठवा, पुरुष दिनाच्या शुभेच्छा!
हिमालय पर्वतरांगा भारताच्या 13 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरल्या आहेत. यात जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, आसाम, आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश होतो. हिमालय रांगांना जगातील सर्वांत उंच आणि तरुण पर्वतरांगांपैकी एक मानलं जातं.