तुम्ही प्रवासाची तारीख बदलण्यासाठी किंवा प्रवाशाचं नाव बदलण्यासाठी तिकीट रद्द करून पुन्हा बुक करत असाल, तर तुम्हाला पुन्हा कन्फर्म तिकीट मिळवण्याचं आव्हान येतं. पण, रेल्वेने तुमचं हे समस्या सोडवली आहे. आता तुम्हाला तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख किंवा प्रवाशाचं नाव बदलता येईल.
हे ही वाचा : Money Horoscope: 3 राशींच्या व्यक्तींचं होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान! कंजूस व्हाल तर फायद्यात राहाल
advertisement
सर्वप्रथम हे जाणून घ्या की, तिकीटावर नाव बदलण्याची सुविधा फक्त ऑफलाइन तिकिटांवर उपलब्ध आहे, जे तुम्ही रिझर्वेशन काऊंटरवरून बुक केले आहेत. यामध्ये तुम्ही केवळ तुमच्या जवळच्या कुटुंबीयांचे किंवा नातेवाईकांचे नाव बदलू शकता. उदाहरणार्थ, पालकांचे, भाऊ-बहिणीचे किंवा मुलांचं नाव बदलता येईल. तसेच, जर तुम्ही विद्यार्थ्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा गट तिकीट बुक केलं असेल, तर त्या तिकीटावर देखील नाव बदलण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
नाव बदलण्याची प्रक्रिया कशी आहे?
• सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या नजीकच्या रेल्वे तिकीट रिझर्वेशन काऊंटरवर जावे लागेल, आणि ट्रेनच्या सुटण्याच्या 24 तास आधी पोहोचणं आवश्यक आहे.
• तिकीटावर नाव बदलण्यासाठी तुम्हाला लेखी अर्ज करावा लागेल.
• काऊंटरवर, तुम्हाला पहिल्या प्रवाशाचं आणि दुसऱ्या प्रवाशाचं ओळखपत्र (ID) द्यावं लागेल.
• आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर, रेल्वे कर्मचारी नवीन प्रवाशाचं नाव तिकीटावर टाकतील.
• लक्षात ठेवा की, एकाच प्रवाशासाठी नाव फक्त एकदाच बदलता येईल.
तिकीटावर प्रवासाची तारीख बदलण्यासाठी काय करावे?
• जर तुम्ही तिकीट काऊंटरवरून घेतले असेल, तर ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी काऊंटरवर जा.
• तुमचं मूळ तिकीट काऊंटरवर सादर करा आणि प्रवासाची तारीख बदलण्यासाठी अर्ज करा.
• काऊंटरवरील कर्मचारी तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासाची तारीख सांगून दुसरे तिकीट देतील.
• लक्षात ठेवा की, सध्या ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटावर तारीख बदलण्याचा पर्याय उपलब्ध नाही.
• तारीख बदलण्याची सुविधा फक्त कन्फर्म किंवा RAC तिकिटांसाठी उपलब्ध आहे. तत्काळ तिकीट (Tatkal) या मध्ये समाविष्ट नाहीत.
• प्रवासाची तारीख एकाच प्रवाशासाठी फक्त एकदाच बदलता येईल. यासाठी तिकीट उपलब्धतेवर अवलंबून असते.
हे नवीन नियम तुमचं प्रवासाच्या तारखेला किंवा नावाला आवश्यक बदल करतांना अधिक सोयीस्कर बनवतील.
हे ही वाचा : ना 18 ना 36, नवरा-बायकोचे किती गुण जुळणं सर्वश्रेष्ठ? प्रसिद्ध ज्योतिषांनी सांगितलं….