TRENDING:

Health Tips: 'या' लोकांसाठी धोक्याची ठरू शकते तूरडाळ; चुकूनही खाऊ नका ,नाही तर येईल पश्चातापाची वेळ

Last Updated:

Health Tips: तुरीची डाळ उष्ण प्रकारातली असल्याने काहींच्या आरोग्यासाठी ती धोक्याची ठरू शकते. डायबिटीस किडनी आणि मुळव्याधीचा त्रास असणाऱ्यां रूग्णांनी तूरडाळ खाऊ नये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुरीच्या डाळीत पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, सोडियम, फायबर, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक देखील असतात.तुरीची डाळ प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत आहे. तुरीच्या डाळीचे अनेक फायदे आहेत. मात्र तुरीची डाळ उष्ण प्रकारातली असल्याने काहींच्या आरोग्यासाठी ती धोक्याची ठरू शकते. जाणून घेऊया कोणते आजार असलेल्या रूग्णांनी तूरडाळ खाऊ नये.
प्रतिकात्मक फोटो: 'या' लोकांसाठी धोक्याची ठरू शकते तूरडाळ;
प्रतिकात्मक फोटो: 'या' लोकांसाठी धोक्याची ठरू शकते तूरडाळ;
advertisement

डायबिटीस

तूरडाळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते. तुरीच्या डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांच्या तूरडाळ खाणं टाळावं

लठ्ठपणा

तुरीच्या डाळीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्हाला आधीच लठ्ठपणाचा त्रास असेल आणि तुम्ही तूरडाळ जास्त प्रमाणात सेवन केली तर तुमचं झपाट्याने वाढू शकतं त्यामुळे तुम्ही जर डाएट करून वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तूरडाळ उच्च कॅलरी आणि प्रथिनंयुक्त खाणं टाळा.

advertisement

'Benefits of Garlic: लसणाचे ‘इतके’ फायदे माहिती आहेत का ? रोज खा लसूण दूर पळतील कॅन्सर, हार्ट ॲटॅक'

किडनीचे रुग्ण

किडनीचा त्रास असलेल्या रुग्णांनी तुरीची डाळ खाणे टाळावे. या डाळीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे किडनीच्या समस्या आणखी वाढू शकतात. या डाळीच्या अतिसेवनानेही किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते.

मूळव्याध

advertisement

तुरीच्या डाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने मूळव्याधच्या रुग्णांनीही याचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. तुरीच्या डाळीतील प्रथिने पचण्यास पचनसंस्थेला जास्त वेळ लागतो. त्यामुळे अनेकदा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो ज्याचं रूपांतरपुढे मुळव्याधात होतं.

'सफरचंदाचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का?; रोज सफरचंद खाल्ल्यास राहाल चिरतरुण'

ऍलर्जी

ज्यांना तुरीची ऍलर्जी आहे त्यांनीही ती खाणे टाळावे. तुरीच्या सेवनाने ऍलर्जीचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे त्यांना त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे आणि लाल पुरळ येण्याची शक्यता असते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips: 'या' लोकांसाठी धोक्याची ठरू शकते तूरडाळ; चुकूनही खाऊ नका ,नाही तर येईल पश्चातापाची वेळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल