तुम्हालाही केस पातळ असणे व गळणे या समस्या असतील तर केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आजीने सांगितलेला हा उपाय ट्राय करू शकता. आम्ही तुम्हाला एका घरगुती तेलाबद्दल सांगणार आहोत. हे तेल कसं बनवायचं व या तेलाचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
केस लांब करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा?
- मोहरीचं तेल
advertisement
- कांद्याचा रस
केसांना मोहरीचं तेल लावल्याने काय होतं?
- मोहरीचं तेल केसांसाठी नॅचरल कंडिशनरचं काम करतं.
- केसांचं पोषण करण्यापासून ते त्यातला कोरडेपणा कमी करण्यासही ते फायद्याचं ठरते.
- हे नवीन केस येण्यास आणि योग्य पोषण प्रदान करण्यास मदत करतं.
कांद्याचा रस केसांना लावल्यास काय फायदा होतो?
- कांद्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं, जे केस चमकदार आणि दाट होण्यास मदत करतं.
- कांद्यात सल्फर असल्यामुळे ते केस पातळ होण्यापासून रोखतं.
- कांद्यामध्ये असलेली अँटिऑक्सिडंट तत्त्व केसात ओलावा प्रदान करण्यास मदत करतात.
केस लांब करण्यासाठी काय करावं?
- सर्वात आधी एका बाउलमध्ये केसांच्या लांबीनुसार लावायला आवश्यक वाटेल तितकं मोहरीचं तेल घ्या.
- एक कांदा बारीक करून त्याचा रस काढा आणि एका वाटीत ठेवा.
- हे दोन्ही चांगले मिसळा आणि हाताच्या बोटांच्या मदतीने टाळूपासून संपूर्ण केसांना लावा.
- हे तेल तुम्ही तुमच्या केसांवर रात्रभर ठेवू शकता किंवा केस धुण्याच्य दोन-तीन तास आधी लावू शकता.
- शॅम्पू आणि कंडिशनरच्या मदतीने केस धुवून घ्या.
- तुम्ही आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.
- याचा सतत वापर केल्याने तुमचे केस काही काळाने गुडघ्यांपर्यंत लांब होऊ शकतात.