TRENDING:

Vaishno Devi travel guide : वैष्णोदेवीला कसे पोहोचाल? कुठे उतरायच, किती खर्चं, कसा करायचा प्रवास, ही घ्या 3 दिवसांची Itinerary आणि A-Z माहिती

Last Updated:

तुम्ही देखील जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी A-Z माहिती घेऊ आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेन, बस आणि प्लेन या तिन्ही मार्गाने कसं पोहोचायचं? कुठे पोहोचायचं? बजेट काय असेल? काय-काय फिरायचं हे सगळं सांगणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल लोकांना वेगवेगळ्या ठिकाणं पाहाण्याची, फिरण्याचं जणू काही वेडच लागलं आहे. लोक निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातात. सुरुवातीला एक काळ असा होता जेव्हा देवाच्या ठिकाणी जायचं म्हणजे ते फक्त म्हाताऱ्या लोकांचं काम असायचं, तेव्हा लोक यात्रेला जायचे, पण तरुण लोक मात्र त्याकडे पाठ फिरवायचे. पण आता काळ बदलला आहे. आता लोक देवदर्शनाला जातात खरं पण त्याला लोकांना आता यात्रा नव्हे तर ट्रॅव्हलींग किंवा ट्रिपचं नाव दिलं आहे. त्यामुळे आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच लोक वैष्णवदेवी, बद्रिनाथ, केदारनाथ, ओंकारेश्वर सारख्या मंदिरांना भेट देतात.
वैष्णव देवी मंदिर दर्शन ट्रॅवल गाइड
वैष्णव देवी मंदिर दर्शन ट्रॅवल गाइड
advertisement

तुम्ही देखील जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी A-Z माहिती घेऊ आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेन, बस आणि प्लेन या तिन्ही मार्गाने कसं पोहोचायचं? कुठे पोहोचायचं? बजेट काय असेल? काय-काय फिरायचं हे सगळं सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमची ट्रिप प्लान करणं सोपं होईल. शिवाय 3 दिवसाचं ट्रॅव्हल गाईड देखील सांगणार आहोत. त्यानुसार देखील तुम्ही प्लानिंग करु शकता.

advertisement

जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिराबद्दल आधी काही माहिती घेऊ

त्रिकुट पर्वतरांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून तब्बल 5,200 फूट उंचीवर वैष्णोदेवीचे पवित्र मंदिर वसलेले आहे. “भवन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य गुहेत दर्शन घेण्यासाठी भाविकांना कटरा पासून 12 किमीचा डोंगरी प्रवास करावा लागतो. इथला रस्ता पूर्णपणे डांबरी, स्वच्छ आणि सुरक्षित आहे. दिवसभर “जय माता दी” च्या घोषणा, भाविकांची श्रद्धा आणि पर्वतरांगांचे सुंदर दृश्य इथे तुम्हाला ऐकायला मिळतं.

advertisement

वैष्णोदेवीला कसे पोहोचाल?

विमानाने

जवळचे विमानतळ: जम्मू विमानतळ (सतवारी).

तिथून कटरापर्यंत अंतर: 50 किमी (टॅक्सीने साधारण 1.5–2 तास).

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, अमृतसर, चंदीगडहून नियमित उड्डाणं उपलब्ध.

रेल्वेने

श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्टेशन हा सर्वात जवळचा स्टेशन आहे.

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबादसह अनेक मोठ्या शहरांतून थेट गाड्या उपलब्ध.

कुटुंबांसाठी हा सर्वात सोयीस्कर आणि लोकप्रिय पर्याय.

advertisement

रस्त्याने

कटरा हा दिल्ली, जम्मू, अमृतसर, चंदीगड, श्रीनगर यांच्याशी थेट जोडलेला आहे. लक्झरी व्हॉल्वो, सरकारी बस आणि खासगी टॅक्सी नेहमी उपलब्ध असतात.

कटरा ते भवन प्रवास

कटऱ्यात आल्यानंतर खरी यात्रा सुरू होते. इथून तुम्हाला भवनला पोहोचायचं आहे यामधील एकूण अंतर 12 किमी (बंगंगा ते भवन) आहे.

प्रवासाचे पर्याय:

कटरा ते भवन चा प्रवास तुम्ही पायी करु शकता, बहुतेक भाविक हे चालतच जातात.

advertisement

तर काही लोक घोडे / पालखीचा पर्याय निवडतात. हा पर्याय वृद्ध किंवा लहान मुलांसाठी सोयीस्कर आहे.

बॅटरी वाहनांचा पर्याय ही उपलब्ध आहे, पण ते अर्धकुंवारी ते भवन दरम्यान आहे.

हेलिकॉप्टर – कटरा ते संजीछट (फक्त 2.5 किमी चालायचं उरतं).

रस्त्यावर खाणं-पिणं, वैद्यकीय मदत आणि विश्रांतीसाठी आश्रयस्थानं मिळतात.

यात्रेतले महत्त्वाचे टप्पे

बंगंगा: यात्रेचं प्रवेशद्वार.

चरणपदुका: माताजींचे चरणचिन्ह असलेलं पवित्र स्थळ

अर्धकुंवारी गुहा: इथे माताजी 9 महिने ध्यानस्थ होत्या असं मानलं जातं.

संजीछट: भवनच्या आधीचं शेवटचं टप्पा, इथून दरीचं अप्रतिम दृश्य दिसतं.

ज्यांना 3दिवसात ही यात्रा पूर्ण करायची आहे त्यांच्यासाठी खालील नियोजन दिलं आहे.

दिवस 1 – कटऱ्यात उतरा

हॉटेल किंवा गेस्टहाऊस मध्ये चेक-इन करा.

यात्रा प्रवेश पास घ्या, तो ऑनलाइनही मिळते.

संध्याकाळी कटरा बाजार फिरा, प्रसाद वगैरे खरेदी करा.

रात्री लवकर जेवून आराम करा.

काही भाविक रात्रीच पायी प्रवास सुरू करतात, गर्दी कमी असते. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हा पर्याय देखील अवलंबू शकता.

दिवस 2 – कटरा ते भवन

सकाळी लवकर बंगंगेतून प्रवास सुरू करा.

चरणपदुका → अर्धकुंवारी → संजीछट मार्गे पुढे चढा.

भवनात पोहोचल्यावर सामान आणि मोबाईल क्लोक रूममध्ये ठेवा.

माताजींच्या गुहेत दर्शन घ्या.

संध्याकाळपर्यंत परत कटरा उतरा किंवा भवन/संजीछट येथे मुक्काम करु शकता.

दिवस 3 – परतीचा प्रवास + पर्यटनस्थळं

जर भवनात थांबलात तर सकाळी लवकर कटऱ्यात परत या.

नाश्ता करून थोडं विश्रांती घ्या.

जवळची स्थळं पाहण्यासाठी वेळ काढा:

बहू किल्ला आणि बाग-ए-बहू (जम्मू)

रघुनाथ मंदिर (जम्मू शहर)

पटनीटॉप हिल स्टेशन (2.5–3 तासांचा प्रवास)

मानसर तलाव (62 किमी)

संध्याकाळी जम्मूला जाऊन परतीचा प्रवास सुरू करा.

वैष्णोदेवी जवळची आणखी काही पर्यटनस्थळं

शिवखोरी गुहा (80 किमी): नैसर्गिक शिवलिंग असलेलं प्रसिद्ध स्थळ.

पटनीटॉप (85 किमी): गार हवामान, हिरवीगार कुरणं आणि स्नो अ‍ॅक्टिव्हिटीज.

मानसर तलाव (62 किमी): शांत व रम्य सरोवर, बोटिंगची सोय.

रघुनाथ मंदिर, जम्मू (48 किमी): उत्तर भारतातील मोठ्या मंदिरांपैकी एक.

बहू किल्ला व बाग (40 किमी): ऐतिहासिक किल्ला आणि सुंदर बाग.

कधी जावं?

मार्च ते ऑक्टोबर: हवामान आल्हाददायक, प्रवासासाठी सर्वोत्तम.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी: थंडी आणि हिमवर्षाव, गर्दी कमी पण उबदार कपडे हवेत.

नवरात्री: वातावरणात विशेष उत्साह, पण प्रचंड गर्दी.

यात्रेचे खास टिप्स

हेलिकॉप्टर आणि यात्रा पास आधीच ऑनलाइन बुक करा.

ट्रेकिंग शूज वापरा, चप्पल टाळा.

उन्हाळ्यातसुद्धा थोडे उबदार कपडे ठेवा, रात्री थंडी असते.

पाणी, सुका मेवा, औषधं, टॉर्च सोबत ठेवा.

भवनात फोटोला परवानगी नाही.

कटऱ्यात बजेट हॉटेल्स, धर्मशाळा, लक्झरी हॉटेल्स सर्व पर्याय आहेत.

वैष्णोदेवी यात्रा ही केवळ धार्मिक प्रवास नाही, तर निसर्गसौंदर्य, श्रद्धा आणि मनःशांती यांचा संगम आहे. “जय माता दी” च्या घोषात डोंगर चढणं, माताजींचं दर्शन घेणं हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. एकटे असाल, मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत वरील गाइड आणि 3 दिवसांची योजना तुमचा प्रवास अधिक सुंदर आणि सोपा करेल.

तर मग तयारीला लागा, तिकिटं बुक करा आणि माताजींच्या दर्शनासाठी रवाना व्हा. जय माता दी!

यात्रेला निघण्यापूर्वी खर्च किती येईल हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो. खरं तर बजेट तुमच्या प्रवासाच्या पद्धतीवर अवलंबून असतं म्हणजे तुम्ही बजेट ट्रॅव्हलर आहात की लक्झरी ट्रॅव्हलर.

कटऱ्यात आणि यात्रेच्या मार्गावर खूप budget-friendly options आहेत, तिथे तुमच्या जेवणाची सोय अगदी 100 रुपयापासून ते 400 रुपये प्रति व्यक्ती पर्यंत होईल. शिवाय यात्रा मार्गावर अनेक free langars आणि प्रसाद counters पण आहेत. त्याचा लाभ जर मिळाला तर तो खर्च देखील वाचू शकेल.

हॉटेल/राहण्याचा खर्च (Accommodation Cost)

इथे तुम्ही धर्मशाळेत राहिलात तर तुम्हाल ₹700 – ₹1,200 एका रात्रीचा खर्च येईल. तर तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये राहिलात तर याचा खर्च ₹1,500 – ₹2,500 एका रात्रीसाठी येऊ शकतो.

यात्रा दरम्यान जर तुम्ही घोडी राईड केली तर एका बाजूच्या प्रवासासाठी 800 ते 1200 रुपये खर्च येतो. तसेच बॅटरी कार केली तर 400 रुपये प्रती व्यक्तीसाठी खर्च येतो. तर हेलीकॉप्टरचा खर्च 2000 ते 2500 पर्यंत येतो.

साइट सिनसाठी तुम्ही शेअरींग टॅक्सी बुक केली तर प्रत्येक व्यक्ती 500 ते 800 रुपये खर्च येईल.

अंदाजे एकूण खर्च (Per Person Approx Cost for 3 Days)

जर तुम्ही अगदी बजेट ट्रिपचा प्लान करत असाल तर ते तुम्ही ₹6,000 – ₹8,000 (Train + budget hotel + food) करु शकता. तर कंफर्टेबल ट्रिप ही साधारण ₹10,000 – ₹15,000 (Flight/train 3AC + mid-range hotel + some sightseeing) च्या बजेटमध्ये होऊ शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vaishno Devi travel guide : वैष्णोदेवीला कसे पोहोचाल? कुठे उतरायच, किती खर्चं, कसा करायचा प्रवास, ही घ्या 3 दिवसांची Itinerary आणि A-Z माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल