व्हिटॅमिन डी ब्रेनपासून शरीराच्या प्रत्येक ऑर्गनला मॅसेज पाठवण्याचे काम करते. हे हार्मोनल हेल्थ राखण्यासाठी देखील कार्य करते.या व्हिटॅमिनची कमतरता असलेल्या लोकांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. व्हिटॅमिन डीचा शरीरातील डोपामाइनच्या पातळीवरही परिणाम होतो. त्यामुळे डिप्रेशनची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत, शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता ओळखणे आणि वेळेत त्याची भरपाई करणे सर्वात महत्वाचे आहे.
advertisement
Gas Mantle : गॅस मेंटल कोणत्या धाग्याचे बनलेले असते? पूर्ण जळल्यानंतरही ते शुभ्र प्रकाश कसा देते?
सूर्यप्रकाश शरीराला व्हिटॅमिन डी कसा पुरवतो?
ज्यावेळी आपली स्किन सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा ती कोलेस्टेरॉलच्या कणांसोबत मिळते आणि व्हिटॅमिन डीमध्ये रूपांतरित होते. सूर्यप्रकाशातून उत्सर्जित होणारे अल्ट्राव्हायोलेट बी किरण एकत्र येऊन व्हिटॅमिन डी तयार होतात. या काळात टिश्यूज हा सूर्यप्रकाश शोषून घेतात. कोलेस्टेरॉलच्या कणांसोबत एकत्रित होऊन व्हिटॅमिन डी तयार होते.
किती वाजेच्या उन्हातून व्हिटॅमिन डी मिळतं?
सकाळच्या उन्हातून व्हिटॅमिन डी मिळते. अल्ट्राव्हायोलेट बी किरण सकाळी 6 ते 9.30 दरम्यान उपलब्ध असतात. यानंतर सूर्यप्रकाशात व्हिटॅमिन डी नसते. यानंतर बराच वेळ उन्हात बसूनही काही फायदा होत नाही.
फुल नाही तर 'या' रंगाचे कपडे हिवाळ्यात ठेवतील उबदार; विश्वास बसत नसेल तर ट्राय करुन पाहा
व्हिटॅमिन डीसाठी अशा प्रकारे सूर्यप्रकाश घ्या
तुम्ही दररोज 10 ते 20 मिनिटे उन्हात बसलात तर तुम्हाला व्हिटॅमिन डी सहज मिळू शकते. याशिवाय आठवड्यातून 3 दिवस 6 ते 9.30 वाजेपर्यंत सूर्यप्रकाश घेतल्यास व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघते. त्याचा मेंदू, झोप, त्वचा आणि केसांवर थेट परिणाम होतो. सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.