जेव्हा शरीराने दिले संकेत
त्रास वाढतच होता, त्यामुळे महिलेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. अखेर हिंमत एकवटून ती महिला डॉक्टरांकडे गेली. तपासणीत तिला एक गंभीर आजाराने ग्रासलंय असं उघड झालं. या आजारामुळे तिच्या शरीरात पाणी आणि पोषक द्रव्यं शोषली जाऊ शकत नव्हती. यामुळेच तिचं वजन झपाट्याने कमी होत होते आणि तिला वारंवार बाथरूमला जावं लागत होतं. ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. आपलं शरीर आपल्याला आजाराचे संकेत देतं. त्यामुळे शरीराच्या संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. कधीकधी अगदी लहान समस्यादेखील एखाद्या मोठ्या आजाराचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
advertisement
डॉक्टरांनी दिली माहिती
महिलेची नीट तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तिला 'क्रोन डिसीज' नावाचा आजार आहे. त्यामुळे पचनसंस्थेला सूज येते. ही सूज तुमच्या पोटापासून गुदद्वारापर्यंत कोणत्याही भागात येऊ शकते. यामुळे पोटदुखी, जुलाब, थकवा आणि वजन कमी होणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. क्रोन डिसीज हा एक जुनाट आजार असून तो आयुष्यभर राहू शकतो. त्याची लक्षणं औषधं आणि योग्य काळजी घेऊन नियंत्रित केली जाऊ शकतात.
सोर्स : सोशल मीडिया
यातून काय शिकायचं?
आपल्या शरीराकडे लक्ष द्या : जर तुमच्या शरीरात काही असामान्य घडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
समस्येचं गांभीर्य समजून घ्या : एखादी छोटीशी समस्या मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते.
नियमित तपासणी : आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे.
निरोगी लाइफस्टाइल : आहार आणि व्यायामासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
मानसिक आरोग्य : तणाव आणि चिंता यांचा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे संतुलित जीवनशैलीचा अवलंब करा.
आरोग्याची काळजी : तुमचं शरीर हे तुमचं मंदिर आहे. त्याची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे.