शरीरात लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होऊ लागते. त्यामुळे शरीर खूप कमकुवत होते. एवढेच नाही तर हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याने किडनीमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत आहारात काही महत्त्वपूर्ण बदल करणे अतिशय आवश्यक आहे. काही पदार्थांच्या नियमित सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करता येऊ शकते.
advertisement
डाळिंब : हे फळ आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम, प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. अशा स्थितीत 'अॅनिमिया'चा त्रास कमी करण्यासाठी डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो.
नाचणी : नाचणीमध्ये असलेले लोह नव्या रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि 'अॅनिमिया'विरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त ठरते. मोड आलेल्या नाचणीमध्ये नाचणीच्या पिठापेक्षा तुलनेने अधिक पोषकतत्वे आणि लोह असतात. उदा. अंकुरित नाचणीमध्ये प्रति १०० ग्रॅम ५१ मिलीग्राम इतके लोह असते, तर नाचणीच्या पिठात केवळ ५ मिलीग्राम इतकेच लोह असते.
अंजीर : अंजीर व्हिटॅमिन आणि प्रथिनांनी समृद्ध आहे. हे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी खाल्ल्यास शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधारू शकते.
कडीपत्ता : सकाळी कडीपत्त्याची चहा पिऊन दिवसाची सुरुवात केल्यास इन्सुलिन प्रतिरोध कमी होऊन लोह आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
भाजलेले चणे : एक कप चण्यांमध्ये 4.7 मिलीग्राम लोह असते. यातील व्हिटॅमिन सी लोह शोषून घेण्यासाठी मदत करतो. याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरता काही दिवसांमध्येच नियंत्रणात येऊ शकते.