मिलेट म्हणजे काय?
मिलेट हा प्राचीन धान्याचा एक प्रकार आहे. जो दोन प्रकारच्या धान्यांपासून बनविला जातो. अनेकांना मिलेट म्हंटलं की बाजरीची आठवण येते. हा मिलेटमधील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. भारत, नायजेरिया मिलेटचा संबंध बाजरीचा असल्याचा आठवतो, जो मिलेट मध्ये सर्वात लोकप्रिय आहे. मिलेट हे भारतसह आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये याचं उत्पादन होतं.
advertisement
Kojagiri Purnima 2023 : यंदाच्या कोजागिरीला फक्त मसाला दूधच नाही खीरही बनवा, पाहा खास रेसिपी!
बाजरीचे धान्य रक्तदाब कमी करू शकते आणि गॅस्ट्रिक अल्सर आणि पोटाचा कर्करोग टाळू शकते. बाजरी बद्धकोष्ठता, सूज आणि लठ्ठपणा कमी करण्यास देखील मदत करू शकते.
मिलेट हे एक पौष्टिक पीक आहे, डोंगराळ, किनारी, पावसावर अवलंबून आणि कोरड्या भागात त्याचे उत्पादन घेता येते. जमिनीची मर्यादित सुपीकता किंवा वनस्पतींची वाढ टिकवून ठेवण्याची मातीची क्षमता आणि जमिनीतील ओलाव्याची श्रेणी लक्षात घेऊन ही धान्ये त्यात सहज उगवतात. ज्यात भरड आणि सूक्ष्म धान्यांचा समावेश केला जातो. बाजरीसह नाचणी, बाजरी, झांगोरा, ज्वारी, कोडो, बेरी, चेना, कांगणी, कुटकी, मूग, इतर धान्यांचाही मिलेटमध्ये समावेश होतो, अशी माहिती संगिता यांनी दिली.
Kitchen Jugaad Video - लिंबू-मिरची नाही पण घरात कांद्याची माळ नक्की लावा; टळेल मोठा धोका
मिलेट्सचे मुख्य प्रकार
कोडो मिलेट्स (कोद्रा) हा एक महत्तावाचा औषधी पदार्थ आहे. हे अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहे. रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित करण्याच्या क्षमतेसाठी हे ओळखले जाते. कोडो मिलेट्सला सौम्य, मातीची चव असते आणि ती उपमा आणि खिचडीसह विविध पदार्थांमध्ये वापरली जाऊ शकते.
लहान मिलेट, ज्याला मराठीमध्ये “सवा, वरी किंवा हलवी” देखील म्हणतात, हा एक प्रकारचा लहान-बिया असलेला मिलेटचा प्रकार आहे. या मिलेट्सचे दाणे हलके पिवळसर रंगाचे लहान आणि गोल असतात. ते अत्यंत पौष्टिक आणि ग्लूटेन-मुक्त असतात. ती भातासारखीच शिजवता येतात. त्याचबरोबर दलिया, उपमा, खिचडी आणि अगदी भाजलेल्या पदार्थांमध्येही वापरली जाऊ शकते. हे फायबर, प्रथिने आणि आवश्यक खनिजांनी समृद्ध आहे, ज्यामुळे ते संतुलित आणि निरोगी आहारासाठी उपयुक्त आहे.
Weight Loss : वजन कमी करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरतायंत? मग आजपासून हे प्रोटीन फूड्स खाणं टाळा
मिलेट्स म्हणजे भरड धान्यामध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ते फायबरने समृद्ध असतात आणि त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, तांबे आणि मॅग्नेशियम हे धान्य रक्तपेशी बनवण्यातही मदत करतात, अशी माहिती संगिता यांनी दिली.





