advertisement

Kojagiri Purnima 2023 : यंदाच्या कोजागिरीला फक्त मसाला दूधच नाही खीरही बनवा, पाहा खास रेसिपी!

Last Updated:
कोजागिरी पौर्णिमा आपल्या आयुष्यात आनंद आणि चैतन्य घेऊन येते. चंद्राच्या मंद प्रकाशात, आप्तजनांसोबत गप्पा कारण, मजामस्ती करणं, नाच गाणं करत आनंद साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेला गोड पदार्थांमध्ये खीर आणि मसाला दूध करण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी हे पदार्थ अमृत प्रसाद बनते. आज आम्ही तुम्हाला खीर आणि मसाला दूध बनवण्याच्या दोन सोप्या आणि चविष्ट रेसिपीज सांगणार आहोत.
1/8
 <a href="https://news18marathi.com/religion/kojagiri-2023-is-important-for-keeping-awake-at-night-and-drinking-masala-milk-mhrp-1066459.html">कोजागिरी पौर्णिमेला</a> खीर आणि दूध बनवून रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी ठेवतात जेणेकरून त्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश त्या त्यावर पडेल. असे मानले जाते की, या दिवशी चंद्राची किरणे अमृताचा वर्षाव करतात. त्यामुळे चंद्रकाशात ठेऊन अमृत प्रसाद खावा. चला तर मग पाहुयात खीर आणि मसाला दुधाची रेसिपी.
कोजागिरी पौर्णिमेला खीर आणि दूध बनवून रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी ठेवतात जेणेकरून त्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश त्या त्यावर पडेल. असे मानले जाते की, या दिवशी चंद्राची किरणे अमृताचा वर्षाव करतात. त्यामुळे चंद्रकाशात ठेऊन अमृत प्रसाद खावा. चला तर मग पाहुयात खीर आणि मसाला दुधाची रेसिपी.
advertisement
2/8
खीर बनवण्यासाठी तुम्हाला 1 लिटर फुल क्रीम दूध, 150 ग्रॅम बासमती तांदळाचे तुकडे, 1 चमचा तूप, काजू-बदाम-पिस्त्याचे काप, 1 टीस्पून गुलाब पाणी, 250 ग्रॅम साखर, 1/2 टीस्पून वेलची पावडर, 15-20 गुलाबाच्या पाकळ्या, 5-6 केशर काड्या लागतील.

3/8
सर्वात आधी बासमती किंवा कोणतेही सुगंधित तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ते 20-25 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. आता दूध मध्यम मंद आचेवर उकळायला ठेवा. एका कढईत तूप गरम करून त्यात तांदूळ घालून परतून घ्या.

4/8
त्यानंतर उकळत्या दुधात भाजलेले तांदूळ टाका आणि 20 ते 25 मिनिटे दोन्ही शिजवून घ्या. यामध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप टाका. खीर चांगली शिजल्यानंतर गॅस बंद करून त्यात साखर, गुलाबपाणी, वेलची पावडर आणि केशर घालून मिक्स करा.

5/8
खीर तयार झाल्यानंतर तिला सजवण्यासाठी एका भांड्यात काढून त्यात काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घाला. तसेच गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा. खीर व्यवस्थित पातळ कापडाने झाकून चंद्राच्या प्रकाशात ठेवा. त्यानंतर काही वेळाने किंवा सकाळी हा खिरीचा प्रसाद खा.

6/8
मसाला दूध बनवण्यासाठी तुम्हाला 1 लिटर फुल क्रीम दूध, काजू-बदाम-पिस्त्याचे काप, आवडीनुसार चारोळी, 100 ग्रॅम साखर, 1/2 टीस्पून वेलची पावडर, १ चिमूट जायफळ पावडर, 5-6 केशर काड्या.
मसाला दूध बनवण्यासाठी तुम्हाला 1 लिटर फुल क्रीम दूध, काजू-बदाम-पिस्त्याचे काप, आवडीनुसार चारोळी, 100 ग्रॅम साखर, 1/2 टीस्पून वेलची पावडर, १ चिमूट जायफळ पावडर, 5-6 केशर काड्या.
advertisement
7/8
सर्वप्रथम एका दूध घ्या आणि ते मध्यम आचेवर वाटण्यासाठी ठेवा. मध्ये मध्ये दूध नीट ढवळत राहा, जेणेकरून ते जळणार नाही किंवा पॅनला चिकटणार नाही. दूध 1/3 झाल्यावर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि साखर घालून मिक्स करा.

8/8
 त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ता, काही चारोळ्या आणि केशरच्या काड्या घालून आणखी पाच मिनिटे उकळा. दूध तयार झाल्यानंतर एका ग्लासमध्ये काढा आणि काही वेळ चंद्राच्या प्रकाशात ठेवा आणि <a href="https://news18marathi.com/religion/kojagiri-purnima-2023-in-auspicious-yoga-worship-moon-and-lakshmi-on-these-auspicious-occasions-mhrp-1066458.html">कोजागिरी पौर्णिमेनिमित्त</a> मसाला दुधाचा आस्वाद घ्या.
त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ता, काही चारोळ्या आणि केशरच्या काड्या घालून आणखी पाच मिनिटे उकळा. दूध तयार झाल्यानंतर एका ग्लासमध्ये काढा आणि काही वेळ चंद्राच्या प्रकाशात ठेवा आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दुधाचा आस्वाद घ्या.
advertisement
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement