TRENDING:

Tulsi Plant Care : तुळशीची पान काळी पडू लागलीयेत? वापरा 3 टिप्स तुळस होईल हिरवीगार

Last Updated:

तुम्ही निरीक्षण केलं असेल तुळशीची पाने काहीवेळा काळी पडू लागतात. तेव्हा यामागचं नेमकं कारण काय आणि यावर कोणते उपाय करता येतील याविषयी जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तुळशीच्या रोपाला धार्मिक महत्व असल्याने जवळपास प्रत्येक घरात तुळस आढळते. तुळस ही घरासाठी शुभ मानली जाण्यासोबतच आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. परंतु तुम्ही निरीक्षण केलं असेल तुळशीची पाने काहीवेळा काळी पडू लागतात. यावर वेळीच योग्य उपाय केले नाहीत तर संपूर्ण झाडाची पाने काळी पडल्याचे पाहायला मिळते. तेव्हा यामागचं नेमकं कारण काय आणि यावर कोणते उपाय करता येतील याविषयी जाणून घेऊयात.
तुळशीची पान काळी पडू लागलीयेत? वापरा या टिप्स तुळस होईल हिरवीगार
तुळशीची पान काळी पडू लागलीयेत? वापरा या टिप्स तुळस होईल हिरवीगार
advertisement

तुळशीची पाने काळी का पडतात?

तुळशीची पाने काळी पडण्यामागे अनेक कारण असू शकतात. यापैकी एक कारण म्हणजे झाडाला कीड लागणे. झाडाला लागलेली कीड अनेकदा लगेच तुमच्या डोळ्यांना दिसून येत नाही कारण ती मातीच्या आत देखील असू शकते. कीड लागल्यामुळे देखील तुमच्या झाडाची पाने काळी पडू शकतात. जर मातीत कीड असेल तर सर्वात आधी मातीपासून जवळ असलेली पाने काळी पडू लागतात. तेव्हा जर तुमच्या तुळशीच्या रोपावर असे काही बदल जाणवले तर तुम्ही होममेड कीटनाशकांचा वापर करू शकता. तसेच काळी पडलेली पाने तोडून टाका.

advertisement

Chicken Buying Tips : खरेदी करताना 'या' गोष्टी नक्की तपासा; मिळेल फ्रेश आणि चांगले चिकन

तुळशीची पाने काळी होण्यापासून कशी रोखाल?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटनं वाढवलं टेन्शन; द्राक्षे, केळीची आवक घटली, कांदा अन् लिंबूला किती मिळाला भाव?
सर्व पहा

तुळशीच्या रोपाची पान काळी होण्यामागे पाण्याची कमतरता हे देखील कारण असू शकते. कमी किंवा जास्त पाणी रोपाला नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे पान काळी पडू लागतात. तेव्हा तुळशीच्या रोपाची माती ओली होईल इतकेच पाणी तुळशीला टाका. जास्त पाणी टाकल्याने तुळशीची मूळ जास्त काळ ओली राहून सडतात आणि हळहळू रोप पिवळे पडू लागते. तेव्हा रोपाला पाणी टाकण्यापूर्वी जमिनीतील ओलावा तपासण्यासाठी बोटांचा वापर करू शकता. बोट जर सहज मातीत जात असेल तर रोपाला पाणी देऊ नका.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tulsi Plant Care : तुळशीची पान काळी पडू लागलीयेत? वापरा 3 टिप्स तुळस होईल हिरवीगार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल