Chicken Buying Tips : खरेदी करताना 'या' गोष्टी नक्की तपासा; मिळेल फ्रेश आणि चांगले चिकन
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
चिकन खायला खूप लोकांना वाढते. प्रोटीनचा समृद्ध स्रोत असलेले चिकन आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर मानले जाते. हिवाळयात तर चिकन खाण्याचे प्रमाण खूप वाढते. तुम्हीही ताजे चिकन खाण्याचे शौकीन असेल तर चिकन खरेदी करताना काही बाबींची काळजी नक्की घ्या. या सोप्या टिप्स वापरून तुम्ही फ्रेश आणि चांगले चिकन विकत घेऊ शकता.
चिकनचा वास घ्या : ताजे चिकन ओळखण्याची पहिली स्टेप म्हणजे वासाद्वारे तपासणे. जर कोंबडी एक ते दोन दिवसांची असेल तर त्यातून एक विचित्र वास येतो. आणि जर कोंबडी अर्धा तास किंवा तासापूर्वी कापली गेली असेल तर त्याला दुर्गंधी येत नाही. काहीवेळा चिकन शॉपच्या आतील दुर्गंधीची अचूक कल्पना येणे कठीण होते. म्हणून काही वेळ चिकन बाहेर घेऊन जा आणि ते दुर्गंधी येत आहे की नाही हे तपासा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement






