पुणे विद्यापीठ हादरलं! रूमजवळ जात विद्यार्थिनींसोबत डिलिव्हरी बॉयचं नको ते कृत्य; परदेशी तरुणीच्या 'त्या' आरोपानं खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शुक्रवारी रात्री एका डिलिव्हरी बॉयने विद्यार्थिनींच्या निवासाच्या ठिकाणी घुसून त्यांच्यासमोर अश्लील वर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुणे: विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका परदेशी विद्यार्थिनींसोबत विचित्र आणि हादरवणारी घटना घडली. शुक्रवारी रात्री एका डिलिव्हरी बॉयने विद्यार्थिनींच्या निवासाच्या ठिकाणी घुसून त्यांच्यासमोर अश्लील वर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी पोलिसात तक्रार न करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनातील काही घटकांनी विद्यार्थिनींवर दबाव टाकल्याचा खळबळजनक आरोप खुद्द पीडित विद्यार्थिनींनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी विद्यार्थिनींच्या खोलीपाशी आला होता. तिथे त्याने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या विद्यार्थिनींनी जेव्हा तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पोलीस चौकीत नेण्याऐवजी काही अधिकाऱ्यांनी ही बाब दडपण्याचा प्रयत्न केला. "तक्रार देऊ नका" असे म्हणत विद्यार्थिनींकडून सक्तीने लेखी लिहून घेतल्याचा आरोप शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभेत करण्यात आला.
advertisement
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सोय असतानाही, काही विद्यार्थिनींना प्राध्यापकांच्या निवासाच्या इमारतीत ठेवण्यात आले आहे. या इमारतीत ना सीसीटीव्ही आहेत, ना पुरेसे सुरक्षा रक्षक. या गंभीर त्रुटींमुळे अधिसभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी या घटनेची दखल घेत दोन दिवसांत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत. तसेच याप्रकरणी आता पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 8:12 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे विद्यापीठ हादरलं! रूमजवळ जात विद्यार्थिनींसोबत डिलिव्हरी बॉयचं नको ते कृत्य; परदेशी तरुणीच्या 'त्या' आरोपानं खळबळ









