advertisement

SRH vs RCB : आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये राडा! हेन्रिक क्लासेन Out की Not Out? Video पाहून तुम्हीच सांगा

Last Updated:

Heinrich Klaasen out or not out : थर्ड अंपायरच्या एका निर्णयामुळे हैदराबादचा प्लेयर हेन्रिक क्लासेन प्रचंड संतापलेला दिसला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Third Umpire controversial decision Heinrich Klaasen out or not out
Third Umpire controversial decision Heinrich Klaasen out or not out
Heinrich Klaasen controversial decision : आयपीएल 2026 ला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हाय-व्होल्टेज मॅच पहायला मिळाली. आरसीबीने 16 व्या ओव्हरमध्ये मॅच जिंकली असून दोन पाईंट्ससह पाईंट्स टेबलच्या टॉपवर पोहोचली आहे. अशातच आता या सामन्यात थर्ड अंपायरच्या एका निर्णयामुळे मोठा राडा सुरू झाला आहे. थर्ड अंपायरच्या एका निर्णयामुळे हैदराबादचा प्लेयर हेन्रिक क्लासेन प्रचंड संतापलेला दिसला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

14 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?

सदर घटना हैदराबादच्या बॅटिंगदरम्यान 14 व्या ओव्हरमध्ये घडली, जेव्हा आरसीबीचा बॉलर रोमारियो शेफर्ड बॉलिंग करत होता. शेफर्डने टाकलेल्या शॉर्ट बॉलवर क्लासेनने मोठा शॉट खेळला आणि बॉल हवेत गेला. बाउंड्री लाईनवर उभा असलेल्या फिल सॉल्टने हा कॅच पकडला, मात्र तो बाउंड्रीच्या अगदी जवळ होता. फिल सॉल्ट याने अफलातून कॅच घेतला अन् पाहणाऱ्यांच्या डोळ्याचं पारण फिटलं. पण सॉल्टचा पाय बाउंड्रीला लागला की नाही, हे तपासण्यासाठी मैदानी अंपायरनी हा निर्णय थर्ड अंपायर रोहन पंडित यांच्याकडे सोपवला.
advertisement

सॉल्टचा पाय बाउंड्रीला लागला?

थर्ड अंपायरसाठी निर्णय कढीण होता. साल्टचा पाय बाउंड्रीला लागला असं काहींचं म्हणण होतं. पण थर्ड अंपायर यांना असं काहीही आढळून आलं नाही. अंपायर पंडित यांनी 'टॉप अँगल' शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो उपलब्ध नसल्याने त्यांनी बाउंड्रीमध्ये कोणतीही हालचाल झाली नसल्याचं दिसून आलंय त्यानंतर त्यांनी क्लासेनला आऊट घोषित दिलं. त्यानंतर आता वाद निर्माण झाला. पण व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा की क्लासेन आऊट होता की नॉटआऊट?
advertisement
advertisement

इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन भडकला

दरम्यान, थर्ड अंपायरच्या या वादग्रस्त निर्णयावर इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन याने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. वॉनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, साल्टचा पाय बाउंड्री स्पंजला स्पर्श करत असल्याचे स्पष्ट दिसत होतं, तरीही अंपायरने इतक्या खात्रीने आऊट कसं दिलं हे समजण्यापलीकडे आहे, असं वॉर्न म्हणाला. तर थर्ड अंपायरने थोडा अधिक वेळ घ्यायला हवा होता, असं मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRH vs RCB : आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये राडा! हेन्रिक क्लासेन Out की Not Out? Video पाहून तुम्हीच सांगा
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement