Mumbai Metro : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आणखी दोन मेट्रो मार्ग सुरु होणार,उद्घाटनाची तारीख ठरली, कोणत्या भागाला सर्वाधिक फायदा?
Last Updated:
Mumbai Metro : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता शहरात एक नाही तर दोन मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. चला तर जाणून घ्या या मेट्रो मार्गिकांचा शुभारंभ कधी होणार आहे?.
मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव पहिला टप्पा तर अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो 2 ब मार्गिकेली डायमंड गार्डनर ते मंडाले पहिला टप्पा मार्गिकेचे लोकापर्ण हे अनेक दिवसांपासून राहिले होते. मात्र आता हजारो प्रवाशांची प्रतीक्षा संपली आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील मेट्रो सुरु होण्याचा मुहूर्त ठरला आहे.
दोन नव्या मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला
गेल्या वर्षी अर्थात 2025 अखेरीस एमएमआरडीएने मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 चा आणि मेट्रो 2 ब मार्गिकेतील डायमंड गार्डनर ते मंडाले टप्पा 1 चे काम पूर्ण झाले होते. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र मिळून ही मेट्रो प्रवाशांसाठी सुरु होणे अपेक्षित होते मात्र पहिल्यांदा तर पालिका निवडणूक आचारसंहिता आणि दुसऱ्यांदा अन्य काही कारणांमुळे या दोन्ही मार्गिकेचा लोकापर्ण रखडले गोते. पण आता ही प्रतिक्षा संपली असून 3 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनेत्रा पवार यांच्या उपस्थिती हे लोकापर्ण पार पडेल,शी माहिती एमएमआरडीएतील सुत्रांनी दिलेली आहे.
advertisement
ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न सत्यात
दोन्ही मार्गिकेतील हे टप्पे सुरु झाल्या मुंबईला आणखी दोन नव्या मेट्रो मार्गिका मिळतील, त्यामुळेच मुंबई शहरातील सध्या कार्यान्वित मेट्रो मार्गिकांची संख्या सहाव येईल आणि मेट्रो 9 मार्गिकेतील पहिल्या टप्प्यामुळे ठाणे जिल्ह्यालाही पहिली मेट्रो मिळणार आहे.
मेट्रो 9 सोबत प्रवाशांना दुहेरी धमाका
मुंबईतील बीकेसीतील परिसरात येणार्या नागरिकांना दररोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो,हाच प्रश्न सोडवण्यासाठी एमएमआरडीने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक पॉड टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गाची लांबी ही 8.8 किमी असून या पॉड टॅक्सीचेही भूमिपूजनही शुक्रवार 3 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 8:01 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आणखी दोन मेट्रो मार्ग सुरु होणार,उद्घाटनाची तारीख ठरली, कोणत्या भागाला सर्वाधिक फायदा?







