रवीसारखीच पोटातील गॅसची समस्या असलेले कितीतरी लोक आहे. गॅस झाला की इनो प्यायचं, हा ठरलेला उपाय. इनोमध्ये सोडियम बायकार्बोनेट असतं. ज्यामुळे तात्पुरता आराम मिळतो. पण पोटातील आम्लाचं नैसर्गिक संतुलन बिघडतं आणि गॅस पुन्हा-पुन्हा होतो. तुम्हाला माहिती नसेल तुम्ही घरीच असे ड्रिंक बनवू शकता ज्यामुळे तुम्हाला पोटातील गॅसपासून आराम मिळू शकतो. या ड्रिंकमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा गॅसवरील परिणाम रिसर्चमध्येही दिसून आला आहे.
advertisement
Acidity Breakfast : ॲसिडिटी झालीये! ब्रेकफास्टला खा हे 5 पदार्थ, छातीतील जळजळ कमी होण्यास होईल मदत
पण पोटातील गॅसवरील हे घरगुती उपाय जाणून घेण्याआधी आपण पोटात गॅस का होतो त्याची कारणं
अन्न नीट न पचणं : हे पोटात गॅस मुख्य कारण आहे. काही अन्न पूर्णपणे पचत नाही. ते मोठ्या आतड्यात गेल्यावर बॅक्टेरिया त्याचं फर्मेंटेशन करतात. त्यातून गॅस तयार होतो.
जलद खाणं, हवा गिळणं : घाईघाईत जेवण, बोलत-बोलत खाणं, च्युइंग गम चघळणं, धूम्रपान यामुळे
जास्त हवा पोटात जाते आणि गॅस तयार होतो.
काही विशिष्ट पदार्थ : चणे, राजमा, हरभरा असे कडधान्ये, कोबी, फ्लॉवर, कांदा अशा काही भाज्या, दूध, मैदा, बेकरी पदार्थ, कोल्डड्रिंक, सोडा असे काही पदार्थ आणि ड्रिंक पोटात जास्त गॅस तयार करतात.
बद्धकोष्ठता : शौचाला नीट होत नाही. मल साचून राहतो. यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते, गॅस अडकतो आणि पोट फुगतं.
Milk : दूध पिण्याचे गंभीर दुष्परिणाम; या 6 लोकांनी तर बिलकुल पिऊ नये
आम्लपित्त आणि अॅसिडिटी : पोटात जास्त आम्ल तयार होतं, पचन बिघडतं यामुळेही गॅस होतो.
ताण-तणाव आणि चिंता : आतडे आणि मेंदूच्या कनेक्शनमुळे मानसिक ताण पचनावर परिणाम करतो. यात गॅस, आयबीएससारखी लक्षणे दिसतात.
शारीरिक आणि आतड्यांची कमी हालचाल : सतत बसून काम, व्यायामाचा अभाव, आतड्यांची हालचाल कमी होणे यामुळे आतड्यांतील बॅक्टेरियांचं संतुलन बिघडतं. अँटिबायोटिक्स घेतल्यानंतर याचे परिणाम जास्त दिसतात.
काही आजार : आयबीएस, गर्ड, लॅक्टोज इन्टोरेन्स, सिबो असे काही आजार आहे, ज्यात गॅसची समस्या उद्भवते.
वाढत्या वयाचा परिणाम : वाढल्यावर पचन एन्झाइम्स कमी होतात, अन्न उशिरा पचतं. परिणामी गॅस होतो.
पोटात गॅस झाल्यावर घरगुती ड्रिंक
कोमट पाणी : पोटात गॅस झालं की सगळ्यात पहिलं म्हणजे कोमट पाणी प्या. हा सगळ्यात सुरक्षित पर्याय आहे. यामुळे अडकलेला गॅस पुढे सरकायला मदत होते, आम्लपित्त कमी होतं. पण पाणी पिताना मात्र काळजी घ्या. ते एकदम नाही तर घोट घोट प्यायचं. जेवणानंतर 30-40 मिनिटांनी प्या.
जिरं घातलेलं पाणी : गॅस कमी करणारा नैसर्गिक कार्मिनेटिव्ह म्हणजे जिऱ्याचं पाणी. 1 टीस्पून जिरं, 1 ग्लास पाण्यात उकळा. हे पाणी कोमट करून प्या.
ओव्याचं पाणी : हे अॅसिडिटी आणि गॅस दोन्हीवर उपयोगी आहे. यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते अर्धा टीस्पून ओवा आणि हवं असेल तर चिमूटभर मीठ पाण्यात टाकून उकळून हे पाणी कोमट करून घ्या.
बडिशेप : यामुळे ब्लोटिंग, ढेकरा आणि पोटदुखी कमी होतं. 1 टीस्पून बडिशेप रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी पाणी कोमट करून प्या. पीएमसीमध्ये पब्लिश अभ्यासात बडिशेपचा चहा प्यायल्याने पोटातील हालचालींवर परिणाम दिसला आहे. यामुळे पोटातील स्नायूंना आराम मिळत असल्याचं दिसून आलं आहे.
आलं घातलेलं पाणी : यामुळे पचन एन्झाइम्स सक्रिय होतात, फार आम्लपित्त असेल तर टाळा. रिसर्च गेटमधील रिसर्चनुसार आल्यामुळे पचन जलद होतं. आलं पचनला चालना देतं, जे गॅसच्या समस्येवर मदत करू शकतं.
सूचना : पोटातील गॅसवर नमूद केलेले उपाय सर्वसामान्य माहितीसाठी आहेत. त्याचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
