अनेकांना पाण्याच्या बॉटलच्या झाकणाच्या रंगांबाबत उत्सुकता किंवा कुतुहल असते.मात्र बहुतांश लोकांना त्यामागचा अर्थ माहीत नसतो. प्रवासात, रेस्टॉरंटमध्ये किंवा कुठेही पाणी घेताना आपण किंमत आणि ब्रँड तर पाहतो, पण झाकणाचा रंग नजरेतून सुटतो. प्रत्यक्षात या छोट्याशा कॅपचा रंग तुम्ही पित असलेल्या पाण्याचा प्रकार दर्शवतो. तुम्ही विकत घेतलेली पाण्याची बाटली उघडण्यापूर्वीच तिच्यात फ्लेवर्ड वॉटर आहे की आरओ, अल्कलाइन, इलेक्ट्रोलाइट किंवा नैसर्गिक स्प्रिंग वॉटर, हे कॅपचा रंग पाहून समजते. त्यामुळे कोणत्या रंगाची कॅप असलेल्या बॉटलमध्ये कोणते पाणी असते हे जाणून घेऊया.
advertisement
ग्रीन कॅप - फ्लेवर्ड वॉटर
तुम्ही विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटलीवर हिरव्या रंगाचे झाकन असेल, तर ते फ्लेवर्ड वॉटर असल्याचे संकेत असतात. यामध्ये नैसर्गिक चव नसून त्यात काही फ्लेवर, स्वीटनर किंवा अॅड-ऑन मिसळलेले असतात. साधे पाणी नसल्याने हे पिण्यापूर्वी लेबल तपासणे महत्त्वाचे असते.
ब्लू कॅप - नेचरल स्प्रिंग वॉटर
निळ्या रंगाचे झाकण असलेली पाण्याची बाटली नैसर्गिक स्प्रिंग वॉटरचे प्रतीक आहे. हे पाणी नैसर्गिक झऱ्यांमधून घेतले जाते आणि खूप हलक्या प्रक्रियेतून फिल्टर केले जाते. म्हणून त्याची चव नैसर्गिक असते आणि ते पाणी मिनरलयुक्त असते.
ब्लॅक कॅप - अल्कलाइन वॉटर
तुम्ही अनेकदा सेलिब्रिटींनी काळे झाकण असलेल्या पाण्याच्या बाटल्या वापरताना पाहिले असेल. या बाटल्यांमध्ये अल्कलाइन वॉटर भरलेले असते. सामान्य पाण्यापेक्षा याची पीएच लेव्हल जास्त असते. शरीरातील आम्लता कमी करण्यासाठी हे पाणी उपयुक्त मानले जाते.
व्हाईट कॅप - आरओ किंवा प्रोसेस्ड वॉटर
पांढऱ्या रंगाचे झाकण असलेल्या बाटलीत आरओ किंवा प्रोसेस्ड वॉटर असते. हे मशीनद्वारे शुद्ध केलेले जाते आणि त्यातील मिनरल्स संतुलित केलेले असतात. घरगुती वापरातील पाण्यासारखेच हे सर्वसाधारण पिण्यायोग्य पाणी असते.
रेड कॅप - इलेक्ट्रोलाइट किंवा कार्बोनेटेड वॉटर
जर पाण्याच्या बाटलीवर लाल रंगाचे झाकण असेल, तर ते इलेक्ट्रोलाइट किंवा कार्बोनेटेड वॉटर असते. अशा पाण्यात हलका फिज असू शकतो. पटकन हायड्रेशन देण्यासाठी हे उत्तम मानले जाते.
यलो कॅप - व्हिटॅमिन आणि इलेक्ट्रोलाइट वॉटर
पिवळ्या रंगाचे झाकण असलेल्या बाटल्यांमध्ये व्हिटॅमिन्स आणि इलेक्ट्रोलाइट्स मिसळलेले असतात. हे पाणी शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त असते.
पुढच्या वेळी बाटली बंद पाणी घेताना फक्त किंमत आणि ब्रँड पाहू नका. कॅपचा रंग आणि पाण्याचा प्रकारही नीट तपासा. जरी काही कंपन्या ब्रँडिंगसाठी वेगवेगळे रंग वापरत असल्या तरी लेबल वाचूनच योग्य पाण्याची निवड करणे सर्वात सुरक्षित ठरते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
