बर्ड ऑफ पॅराडाईज
बर्ड ऑफ पॅराडाईज हे एक इनडोअर प्लांट आहे. या झाडाची फुले आकारानं एका पक्षासारखी असतात. अत्यंत सुंदर असं या झाडाचा फुल असतं. हे झाड आपण घरात लावल्यानंतर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन भेटतं. पॅराडाईज या शब्दाचा अर्थ असा होता की फक्त तुमच्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी आणि आनंदाचं वातावरण राहील.
advertisement
उसाचं पाचट जळताना काढला फोटो, 'विंग्ज ऑन फायर' ठरलं जगात भारी Video
पिस लिली
पिस लिली म्हणजे शांतता असा याचा अर्थ होतो. या झाडाला पांढऱ्या रंगाची फुले येतात. हे झाड दिसायला अंत्यत सुंदर दिसतं. तसेच कमी पाण्यामध्ये देखील खूप वाढतं आणि याला खूप सुंदर फुले देखील येतात. हे झाड घरामध्ये ऑक्सिजन पुरवठा करते. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेऊन घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा प्रदान करते, असं कर्णिक सांगतात.
लकी बांबू
या झाडाचे वैशिष्ट्य आहे की ते एक दोन मजली असतात किंवा तीन मजल्यांपर्यंत असतं. हे झाड शुद्ध पाण्यामध्ये याची वाढ होते. ते आपल्याला ऑक्सिजन पुरवतं. तसेच हे झाड आपल्या घरात असेल तर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहील आणि घरात समृद्धी नांदेल, असं सांगितलं जातं.
कडाक्याच्या थंडीचा वृद्धांना धोका, हिवाळ्यात कशी घ्यावी काळजी? Video
मनी प्लांट
हे झाड सुद्धा इनडोअर आहे. आपण हे झाड कुंडी किंवा एखाद्या बॉटल मध्ये सुद्धा लावू शकतो. हे झाड घरात आसल्यामुळे पैसा येतो आणि घरात संपन्नता राहते, असं सांगितलं जातं.
स्नेक प्लांट
स्नेक प्लांटला 'मदर ऑफ द प्लांट' देखील म्हणतात. हे झाड घरातली कुठल्याही कोपऱ्यात असले तरी संपूर्ण घरामध्ये शुद्ध ऑक्सीजान पुरवठा करते, असे कर्णक सांगतात.
आपणही या झाडांचे फायदे पाहून एखादं झाडं नक्की लावा. विशेष म्हणजे या इनडोअर झाडांना सूर्यप्रकाशाची गरज पडत नाही. तसेच घर प्रसन्न आणि शांत वाटतं, असंही कर्णिक सांगतात.