TRENDING:

Salt : ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी कोणत्या मिठाचे सेवन करावे? High BP राहील नियंत्रणात

Last Updated:

मीठमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत तेव्हा आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मिठाचा वापर करायला हवा याविषयी जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मीठ हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक किचनमध्ये वापरला जातो. जेवणात मीठ वापरल्यामुळे पदार्थाला चव येते.. मात्र मीठ हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असतं. मीठमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत तेव्हा ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी कोणत्या प्रकारच्या मिठाचे सेवन करायला हवे याविषयी जाणून घेऊयात.
ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी कोणत्या मिठाचे सेवन करावे?
ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी कोणत्या मिठाचे सेवन करावे?
advertisement

सध्या जगभरात हाय ब्लड प्रेशर ही एक वाढती समस्या आहे. त्यामुळे भारतच नाही तर जगभरातील करोडो लोक त्रस्त आहेत. हाय ब्लड प्रेशरची समस्या असल्यास हृदय रोग, स्ट्रोक आणि किडनी स्टोन अशा समस्या निर्माण होतात. अशातच शरीरातील सोडियमची मात्रा कमी करणे हे महत्वाचे होऊन जाते. अनेकदा लोकांना हाय ब्लड प्रेशर रुग्णांनी कोणते मीठ खावे असा प्रश्न पडतो.

advertisement

तज्ज्ञ याबाबत सांगतात की, सर्व प्रकारच्या मिठात प्रामुख्याने सोडियम क्लोराईड (NaCl) असते, हा घटक रक्तदाब वाढवतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनने प्रौढांसाठी दररोज 2,300 मिलीग्रामपेक्षा कमी सोडियम आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी 1,500 मिलीग्रामपेक्षा कमी सोडियमची शिफारस केली आहे.

हाय ब्लड प्रेशर असलेल्यांची कोणत्या प्रकारचं मीठ खायला हवं?

हिमालयीन गुलाबी सॉल्ट : हिमालयीन हे मीठ त्याच्या खास गुलाबी रंगासाठी ओळखले जाते. त्यात काही प्रमाणात लोह असते, ज्यामुळे गुलाबी रंग असतो. परंतु, यात सोडियमचे प्रमाण टेबल मीठा सारखेच असते.

advertisement

सी सॉल्ट : अनेक लोकांचा असा विश्वास आहे की समुद्री मीठ हे टेबल मीठापेक्षा आरोग्यदायी आहे कारण त्यात खनिजे कमी असतात. पण, सोडियमचे प्रमाण दोन्हीमध्ये जवळपास सारखेच असते.

सैंधव मीठ : सैंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट हे स्वास्थ्यवर्धक मीठ म्हणून ओळखले जाते. हे टेबल मिठापेक्षा कमी शुद्ध असते आणि त्यात सोडियम किंचित कमी असू शकते. परंतु, हा फरक इतका कमी आहे की उच्च रक्तदाबामध्ये याचा विशेष फायदा होत नाही.

advertisement

मिठाचे सेवन कसे कमी करावे?

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मिठाचे सेवन कमी करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही पॅकेटमधीलप्रक्रिया केलेले पदार्थ टाळायला हवेत. तसेच स्वयंपाक करताना त्यात कमी मीठ घालावे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Salt : ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी कोणत्या मिठाचे सेवन करावे? High BP राहील नियंत्रणात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल