कमी फॅट आणि कोलेस्टेरॉल
खिचडीत फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी एक फायदेशीर आहे. खिचडी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी एक चांगला उत्तम आहार आहे.
पचनक्रिया चांगली राहते
खिचडीत फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. जे हेल्दी बॅक्टेरियांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. पचनक्रियेत सुधारणा होऊन आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय संतुलित पचनक्रिया शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यास मदत करते. त्यामुळे वजन वाढत नाही.
advertisement
पूर्णांन्न
खिचडीतील तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्त्रोत आहे तर डाळींतून शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळते. खिचडी खाल्ल्यानं मांसपेशींना पोषकतत्वं मिळतात.खिचडीतल्या फायबर्समुळे पचनक्रिया चांगली राहते. भूक नियंत्रित राहते, फॅट लॉस होण्यास मदत होते. रोज गरमागरम खिचडी खायला हवी असं डॉ. आदिती सांगतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
खिचडी खाल्ल्यानं शरीरातील डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया व्यवस्थित होते. खिचडी खाल्याने तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं त्यामुळे भूक लागत नाही. त्यामुळे अरटबट चरबट खाणं टाळलं जातं, ज्यामुळे अतिरिक्त कॅलरीज पोटात जात नाहीत.
लो ग्लायसेमिक इंडेक्स
खिचडीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. याचा अर्थ असा की ब्लड फ्लोमध्ये हळूहळू ग्लुकोज सोडलं जातं. ज्यामुले रक्तातील साखरेची वाढ रोखता येते. खिचडीचे नियमित सेवन केल्यानं ब्लड शुगर स्पाईक होण्यापासून रोखता येतं.
