TRENDING:

चिप्सच्या पाकिटातील हवा आरोग्यासाठी खतरनाक? कसा होतो परिणाम?

Last Updated:

चिप्सच्या पाकिटात हवा असते, ती का भरतात हे अनेकांना माहिती असेल. पण ही हवा कसली, त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की, जेव्हा आपण चिप्सचं पॅकेट विकत घेतो तेव्हा ते फुगलेलं असतं. ते उघडल्यानंतर त्यातील हवा बाहेर निघून जाते. या पॅकेटमध्ये कोणता वायू भरलेला असतो, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? या चिप्सच्या पॅकेट्समध्ये नायट्रोजन भरलेला असतो. विशेष म्हणजे प्रत्येक पॅकेटवर तसा उल्लेख केलेला असतो. चिप्सच्या पॅकेटमध्ये नायट्रोजन का भरला जातो आणि त्यापासून काही धोका आहे? या प्रश्नांची याठिकाणी उत्तरं देण्यात आली आहेत.
चिप्सच्या पाकिटातील हवेचा आरोग्यावर काय परिणाम?
चिप्सच्या पाकिटातील हवेचा आरोग्यावर काय परिणाम?
advertisement

जगभरातील सर्व ब्रँड्स बटाट्यापासून केळीपर्यंतचे चिप्स पॅकेट्समध्ये नायट्रोजन भरतात. नायट्रोजन हा एक रंगहीन आणि गंधहीन वायू आहे. त्याचा रासायनिक उल्लेख 'N' या अक्षराने केला जातो. सामान्य तापमान आणि दाबामध्ये तो वायू अवस्थेत असतो. पृथ्वीच्या वातावरणामध्ये सुमारे 78 टक्के नायट्रोजन आहे. सहसा त्याची रासायनिक अभिक्रिया होत नाही. 1773 मध्ये स्कॉटिश शास्त्रज्ञ डॅनियल रुदरफोर्ड यांनी त्याचा शोध लावला होता.

advertisement

Viral Home Remedies : प्रेग्नन्सीत केसर खाल्ल्याने खरंच बाळाचा रंग गोरा होतो? Myth Or Fact

नायट्रोजनचे धोके काय आहेत आणि व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो का?

- नायट्रोजन वायू आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करू शकतो. विशेषत: तो मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.

- नायट्रोजन हा एक निष्क्रिय वायू आहे आणि तो पृथ्वीच्या वातावरणाचा सुमारे 78 टक्के भाग व्यापतो असं असूनही तो आपल्या श्वसनात अडथळा निर्माण करू शकतो. त्यामुळे हॅल्युसनेशन आणि चेतना नाहीशी होण्यासारख्या समस्या येऊ शकतात. काही प्रसंगी मृत्यू देखील होऊ शकतो.

advertisement

- नायट्रोजन गंधहीन आणि रंगहीन असल्याने विशेष उपकरणांशिवाय त्याची धोकादायक पातळी शोधणं कठीण आहे.

- नायट्रोजन स्वतः विषारी नसला तरी त्याचे ऑक्साइड (नायट्रोजन डायऑक्साइड) श्वसनाच्या महत्त्वपूर्ण समस्या निर्माण करू शकतात. त्याच्या जास्त संपर्कामुळे अस्थमा वाढू शकतो आणि फुफ्फुसाचे क्रॉनिक आजार होऊ शकतात.

- नायट्रोजन हा एक निष्क्रिय वायू आहे. त्यामुळे बटाट्याच्या चिप्समधील तेल आणि फॅट्सशी त्याची अभिक्रिया होत नाही. तो चिप्सचं ऑक्सिडेशन रोखण्यास मदत करतो त्यांना कुरकुरीत आणि फ्रेश ठेवतो. नायट्रोजनचा वापर करून पॅकेटमधील ऑक्सिजन काढून टाकला जातो.

advertisement

- नायट्रोजनमुळे चिप्स कुरकुरीत राहतात. नायट्रोजन हा कोरडा वायू असल्याने पॅकेटमधील वातावरण ओलावामुक्त ठेवण्यास मदत होते.

दसऱ्याला दिली जाणारी सोन्याची पानं आरोग्यासाठी खरंच सोन्यासारखी! हे फायदे तुम्ही कधीच ऐकले नसतील

नायट्रोजनचा चिप्सला कशा प्रकारे फायदा होतो?

चिप्स नाजूक आणि पातळ असतात. त्यांचा लवकर चुरा होण्याची शक्यता असते. नायट्रोजनचा कुशनिंग इफेक्ट शिपिंग दरम्यान चिप्सचं नुकसान टाळण्यास मदत करतो. बटाट्याच्या चिप्समध्ये त्याचा वापर विशेषतः महत्त्वाचा आहे. आता केळी आणि इतर चिप्सच्या पॅकेटमध्ये देखील नायट्रोजन वापरला जातो.

advertisement

नायट्रोजन पॅकेजिंग कधी सुरू झालं?

20 व्या शतकाच्या सुरुवातीला पॅकेजिंगमध्ये नायट्रोजन वापरण्याची पद्धत लोकप्रिय झाली होती. तेव्हा उत्पादकांनी शेल्फ लाइफ वाढवण्याचे आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्याचे मार्ग शोधले होते. पॅकेट सील करण्यापूर्वी ऑक्सिजन काढून नायट्रोजन भरला जातो. यामुळे पॅकेजिंग चिप्स जास्त काळ खाण्यायोग्य राहतात.

कोणते ब्रँड नायट्रोजन वापरतात?

वेगवेगळे ब्रँड आपल्या पॅकेट्समध्ये नायट्रोजन वेगवेगळ्या प्रमाणात वापरतात. उदाहरणार्थ, लेजच्या पॅकेटमध्ये सुमारे 85 टक्के नायट्रोजन असतो. बिंगो आणि अंकल चिप्स सारखे इतर ब्रँड सुमारे 75 टक्के नायट्रोजन वापरतात.

एफडीएची मान्यता आहे का?

एफडीएने नायट्रोजन वायूचं 'सामान्यतः सुरक्षित' (GRAS) असं वर्गीकरण केलेलं आहे. याचा अर्थ तो फूड पॅकेजिंगमध्ये वापरण्यासाठी सुरक्षित आहे. तो आरोग्यास धोका निर्माण करत नाही.

नायट्रोजनमुळे बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात का?

नायट्रोजनमुळे तयार केलेलं वातावरण काही बॅक्टेरियांच्या वाढीला प्रोत्साहन देऊ शकतं. हे बॅक्टेरिया ऑक्सिजनशिवाय वाढतात पण हानिकारक नसतात.

कोणते खाद्यपदार्थ नायट्रोजन वायूसह पॅक केले जातात?

– चिप्स, पॉपकॉर्न, नट्स आणि इतर स्नॅक्स

– मांस

– प्री-पॅक केलेले लंच मांस

– सॅलड मिक्स आणि लेट्युसेनॅक स्नॅकच्या पिशव्या

– प्री-कट सफरचंद आणि गाजर

– बेकन, स्मोक्ड सॉसेज आणि किलबासा

– वाईनच्या बाटल्या

– आपत्कालीन शिधा

– जांभूळ

– फ्रोझन खाद्य पदार्थ

नायट्रोजनने फूड पॅकेजिंग उद्योगात इतकी लोकप्रियता मिळवली आहे की आता त्याचा मद्यनिर्मिती किंवा कॉफी उद्योगात देखील वापर होतो. 'नायट्रो बिअर' बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कॉफी उद्योगात अंतिम उत्पादनाला चांगली चव देण्यासाठी 'नायट्रो ब्रू' बनवण्यासाठी नायट्रोजन वापरला जातो.

फूड-ग्रेड नायट्रोजन म्हणजे काय?

फूड-ग्रेड नायट्रोजन शुद्ध असतो. त्याची शुद्धता पातळी 99 टक्के किंवा त्याहून अधिक असते. त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत नाही.

वातावरणात किती नायट्रोजन आहे?

आपल्या वातावरणात 78 टक्के नायट्रोजन आणि 21 टक्के ऑक्सिजन आहे. याशिवाय, कार्बन डाय ऑक्साईड, निऑन, हेलियम, मिथेन, क्रिप्टॉन, हायड्रोजन, नायट्रस ऑक्साईड, झेनॉन, ओझोन, आयोडीन, कार्बन मोनोऑक्साइड आणि अमोनिया इत्यादी वायू देखील वातावरणात आहेत.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
चिप्सच्या पाकिटातील हवा आरोग्यासाठी खतरनाक? कसा होतो परिणाम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल