Viral Home Remedies : प्रेग्नन्सीत केसर खाल्ल्याने खरंच बाळाचा रंग गोरा होतो? Myth Or Fact
- Published by:Priya Lad
Last Updated:
आईनं प्रेग्नन्सीत केसर घातलेलं दूध प्यायल्याने बाळ गोरं होतं, असं म्हणतात. पण खरंच असं होतं का? याबाबत न्यूज18मराठीनं तज्ज्ञांकडून जाणून घेतलं आहे.
नवी दिल्ली : आपलं बाळ गोरं असावं असं अनेकांना वाटतं. त्यासाठी प्रेग्नंट महिलांना केसर घातलेलं दूध दिलं जात असल्याचंही तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल. आईनं प्रेग्नन्सीत केसर घातलेलं दूध प्यायल्याने बाळ गोरं होतं, असं म्हणतात. अशी पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. पण खरंच असं होतं का? याबाबत न्यूज18मराठीनं तज्ज्ञांकडून जाणून घेतलं आहे.
केसरमध्ये अँटीऑक्सिडंट्स, कॅरोटेनॉइड्स आणि अनेक पोषक घटक असतात, जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तसंच, हे घटक रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. गर्भधारणेदरम्यान केसरचे नियमित पण माफक प्रमाणात सेवन केल्यास पचन सुधारण्यासाठी तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही मदत होते.
advertisement
जास्त प्रमाणात केसर घातक
केसरमध्ये असलेल्या पोषक गुणधर्मांमुळे गर्भवती महिलांना काही फायदे मिळू शकतात. पण ते योग्य प्रमाणात घेतल्यास. अधिक प्रमाणात घेतल्यास तो घातक ठरू शकतो. साधारणपणे, गर्भवती महिलांनी रोज एक-दोन केसरचे तंतू दुधात मिसळून घेणं सुरक्षित मानलं जातं. मात्र, अधिक प्रमाणात केसर घेतल्यास ते अपायकारक ठरू शकतं. जास्त केसर सेवन केल्यास अपचन, उलटी, अतिसार आणि चक्कर येणं यासारखे दुष्परिणाम दिसू शकतात. याशिवाय, जास्त प्रमाणात केसर घेतल्यामुळे रक्तदाब खूप कमी होण्याची शक्यता असते. गर्भाशयातील आकुंचन वाढल्यामुळे गर्भपात होण्याचा धोका देखील निर्माण होतो.
advertisement
प्रत्येक महिलेच्या शारीरिक परिस्थितीनुसार याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. म्हणूनच, गर्भवती महिलांनी केसरचा आहारात समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
advertisement
केसर खाल्ल्याने बाळ गोरं होतं?
मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. इंद्राणी सांळुखे यांनी सांगितलं, गर्भावस्थेत केसर खाल्ल्याने बाळ गोरं होईल असा कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्वचेचा रंग हा मुख्यतः अनुवांशिक घटकांवर अवलंबून असतो, ज्यामध्ये आई-वडिलांच्या जीनची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे केसर खाल्ल्याने बाळाच्या त्वचेच्या रंगात बदल होईल हा एक फक्त लोकसमज आहे, ज्याला कोणताही वैद्यकीय आधार नाही.
Location :
Delhi
First Published :
October 09, 2024 7:50 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Home Remedies : प्रेग्नन्सीत केसर खाल्ल्याने खरंच बाळाचा रंग गोरा होतो? Myth Or Fact