पण नेमकं असं का होतं? हे काही आजाराचं लक्षण आहे का, की ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे? चला, यामागचं आरोग्यशास्त्र समजून घेऊया.
जेवल्यानंतर झोप येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया
तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर थकवा जाणवणं आणि झोप येणं ही पूर्णपणे नैसर्गिक बाब आहे. याला Postprandial somnolence असं म्हटलं जातं. म्हणजेच, जेवणानंतर शरीर शांत होऊ लागणं आणि डोळे मिटू लागणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे.
advertisement
जेवण झाल्यावर शरीराचं लक्ष पचन प्रक्रियेवर केंद्रित होतं. यासाठी शरीरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणात पचनासाठी वापरली जाते. परिणामी मेंदूकडे कमी ऊर्जा पोहोचते आणि झोप येऊ लागते. विशेषतः प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खाल्ल्यावर ही प्रक्रिया अधिक जाणवते.
जेवणानंतर शरीरात सेरोटोनिन नावाचं केमिकल जास्त प्रमाणात तयार होतं. हे केमिकल मूड आणि झोपेच्या चक्रावर प्रभाव टाकतं. कार्बोहायड्रेट्समुळे ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अॅसिड मेंदूपर्यंत पोहोचण्यास मदत होते. ट्रिप्टोफॅनपासून सेरोटोनिन तयार होतो आणि यामुळे मेंदू सुस्तावतो आणि झोप येऊ लागते.
जेव्हा आपण खूप जड आणि भरपूर जेवण करतो, तेव्हा शरीरातील ब्लड शुगर लेव्हल अर्थात साखरेची पातळी वाढते. त्यामुळेही शरीराला सुस्ती येते. त्याचबरोबर, जर रात्री चांगली झोप झाली नसेल, तर ही झोपेची भावना आणखीनच तीव्र होते.
तर मग काय करावं?
हलकं आणि संतुलित जेवण घ्या, विशेषतः दुपारी.
जेवल्यानंतर थोडं चालणं फायदेशीर ठरू शकतं.
ऑफिस किंवा घरामध्ये थोडं स्ट्रेचिंग किंवा वॉक केल्यास सुस्ती कमी होते.
जास्त झोप येत असल्यास, रात्रीची झोप तपासून घ्या. कदाचित ती अपुरी असेल.
जेवणानंतर झोप येणं ही आजारी असल्याचं लक्षण नाही, तर आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, सतत झोप येणं, कामात अडथळा येणं, थकवा जाणवणं हे नियमित होत असेल, तर आहार आणि जीवनशैलीचा आढावा घेणं आवश्यक ठरतं.
(नोट : वराली माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)