ITU काय आहे आणि हे कोड कसे ठरतात?
जगातील प्रत्येक देशासाठी आंतरराष्ट्रीय कॉलिंग कोड ITU ने ठरवले आहेत. त्यासाठी जगाला वेगवेगळ्या जिओग्राफिक झोनमध्ये विभागलं गेलं आहे. प्रत्येक झोनला एक विशिष्ट नंबर रेंज देण्यात आली. भारताला 9व्या झोनमध्ये ठेवण्यात आलं, ज्यात दक्षिण आशिया, पश्चिम आशिया, मध्य आशिया आणि मध्य पूर्वेतील देशांचा समावेश आहे. याच झोनमध्ये भारताला +91 कोड देण्यात आला.
advertisement
भारताला +91 का मिळाला?
कॉलिंग कोड ठरवताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेण्यात आले –
देशाची लोकसंख्या
देशाचं आर्थिक महत्त्व
ज्या देशांची लोकसंख्या मोठी होती आणि जे आर्थिक दृष्ट्या सक्षम होते, त्यांना छोटे आणि लक्षात ठेवायला सोपे असे कोड देण्यात आले. भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक असल्याने आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचा असल्याने त्याला दोन अंकी आणि सोपा कोड +91 देण्यात आला.
+91 कसं काम करतं?
कोणी परदेशातून भारतात कॉल करताना सर्वप्रथम +91 डायल करतो. त्यानंतर संबंधित शहराचा STD कोड (उदा. दिल्लीसाठी 11, मुंबईसाठी 22) आणि मग मोबाईल किंवा लँडलाइन नंबर टाकला जातो. यामुळे भारतातील नंबर जगभर सहज ओळखता येतात.
भारत आणि शेजारी देशांचे कॉलिंग कोड
भारत – +91
पाकिस्तान – +92
श्रीलंका – +94
बांग्लादेश – +880
संयुक्त अरब अमिरात (UAE) – +971
अमेरिका (US) – +1
युनायटेड किंगडम (UK) – +44
कॅनडा – +1
रशिया – +7
ऑस्ट्रेलिया – +61
सिंगापूर – +65
काही संबंधीत महत्वाचे प्रश्न
1: +91 काय दर्शवतं?
उ. भारताचा आंतरराष्ट्रीय कॉलिंग कोड, जो भारताची भौगोलिक स्थिती आणि जागतिक महत्त्व दर्शवतो.
2: +91 कधी वापरावं लागतं?
उ. जेव्हा भारताबाहेरून भारतातील कुठल्याही नंबरवर कॉल केला जातो.
3: सर्व देशांचे कोड असंच ठरतात का?
उ. हो, ITU प्रत्येक देशाला त्याच्या झोन आणि महत्त्वानुसार वेगळा कोड देते.
4: भारताचा कोड बदलू शकतो का?
उ. नाही, तोपर्यंत बदलणार नाही जोपर्यंत काही मोठे आंतरराष्ट्रीय बदल होत नाहीत. सध्या आणि पुढेही भारताचा कोड +91 राहणार आहे.