नाकारले जाण्याची भीती
प्रेमात नकार मिळू नये असे प्रत्येकालाच वाटते. तथापि, मुलींना कधीही प्रेमात नकार मिळू नये असे वाटत असते. प्रेमात मिळालेला नकार हा मुलींसाठी एखाद्या आघातापेक्षा कमी नसतो. यातून बाहेर येण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो. जर एखाद्या मुलाने त्यांना नकार दिला तर त्यांना त्यांची कुवत कमी वाटते.
प्रेमभंग होण्याची भीती
advertisement
मुली त्यांचे प्रेम व्यक्त करत नाहीत यामागील आणखी एक कारण म्हणजे प्रेमभंग होण्याची भीती. त्यांना सतत असे वाटते की समोरील व्यक्ती त्यांचा आदर करणार नाही, त्यांना सोडून जाईल. परिणामी त्यांचा प्रेमभंग होईल.
स्पेशल फील करणे
अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की मुलींना मुलांनी प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेणे आवडते. म्हणूनच त्या त्यांचे प्रेम लगेचच व्यक्त करत नाहीत. मुलींना सतत असे वाटत असते की मुलांनी त्यांना स्पेशल फील करवून द्यावे. मुलींना त्यांना बरेच जण पसंत करतात ही भावना आवडते. मुलांनी त्यांना प्राधान्य द्यावे असे त्यांना वाटते.
बोल्ड हा टॅग दिला जातो
ज्या मुली त्यांच्या आवडीच्या मुलाला आधी प्रपोज करतात त्यांना बोल्ड असा टॅग दिला जातो. म्हणजेच अशा मुलींबाबत असा विचार केला जातो की त्या लगेच कोणावरही भाळतात. कोणतीही मुलगी स्वतःसाठी असा विचार सहन करू शकत नाही. म्हणूनच त्या नेहमी हिंट्स देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात.
कॅरेक्टरलेस म्हटले जाण्याची भीती
मुले नेहमीच त्यांच्या भावना मुलींना सर्वप्रथम सांगतात. जर एखाद्या मुलाने त्याचे प्रेम मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या तर लोक त्याला रोमँटिक म्हणतात पण जर एखाद्या मुलीने तेच केले तर लोक त्यांना डेस्परेट म्हणतात. कधीकधी काही लोक त्यांच्यासाठी कॅरेक्टरलेस असे शब्दही वापरतात. या सगळ्याचा विचार करून मुली आपल्या भावना सांगणे टाळतात.
