TRENDING:

Baby : बाळाला दूध पाजल्यानंतर ढेकर देणं गरजेचं का असतं? अनेकांना माहित नाही यामागचं कारण

Last Updated:

अनेकदा दूध प्यायल्यानंतर बाळ अचानक रडू लागतं, पाय पोटाशी दुमडतं किंवा अस्वस्थ होतं. अशा वेळी आपल्याला समजत नाही की नेमकं काय झालंय. खरं तर, याचं मुख्य कारण असतं गॅस. हीच समस्या सोडवण्यासाठी बाळाला ढेकर देणे अत्यंत आवश्यक असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या घरात जेव्हा एखादे छोटे पाहुणे म्हणजेच नवजात शिशू येते, तेव्हा आनंदासोबतच जबाबदारीही वाढते. नवीन पालकांसाठी बाळाची प्रत्येक छोटी गोष्ट चिंतेचा विषय ठरते. तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असणार की, घरातील मोठी माणसं नेहमी सांगतात, "बाळाला दूध पाजल्यानंतर त्याला खांद्यावर उभं धरून त्याची ढेकर काढ." पण कधी विचार केलाय का की असं का करायला सांगितलं जातं? अनेकदा दूध प्यायल्यानंतर बाळ अचानक रडू लागतं, पाय पोटाशी दुमडतं किंवा अस्वस्थ होतं. अशा वेळी आपल्याला समजत नाही की नेमकं काय झालंय. खरं तर, याचं मुख्य कारण असतं गॅस. हीच समस्या सोडवण्यासाठी बाळाला ढेकर देणे अत्यंत आवश्यक असते.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

बाळाला ढेकर देणे का गरजेचे आहे?

नवजात बाळ जेव्हा दूध पिते (मग ते आईचे दूध असो वा बाटलीतील), तेव्हा दुधासोबत थोडी हवाही त्याच्या पोटात जाते. ही हवा पोटात छोटे छोटे बुडबुडे तयार करते, ज्यामुळे बाळाला पोटात जडपणा किंवा अस्वस्थता जाणवू लागते. ढेकर दिल्याने ही अडकलेली हवा बाहेर पडते आणि बाळ हलके वाटते. यामुळे पोटदुखी, उलट्या होणे आणि बाळाची चिडचिड कमी होण्यास मदत होते. अनेकदा रडणारे बाळ ढेकर दिल्यावर लगेच शांत होऊन आरामात झोपते.

advertisement

ढेकर काढण्याची योग्य वेळ कोणती?

प्रत्येक बाळाची गरज वेगळी असते. काही बाळांना दूध पितानाच गॅसचा त्रास होतो, तर काहींना दूध पिऊन झाल्यावर. जर दूध पिताना बाळ अचानक अस्वस्थ झाले, शरीर आखडू लागले किंवा रडू लागले, तर दूध पाजणे मध्येच थांबवून त्याला ढेकर द्या. जर बाळ आरामात दूध पीत असेल, तर फिडिंग संपल्यानंतर त्याला ढेकर देणे योग्य ठरते. पालकांनी फक्त बाळाच्या 'सिग्नल्स'कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

advertisement

बाळाला ढेकर देण्याचे 3 सोपे मार्ग

1. खांद्यावर घेऊन ढेकर देणे (सर्वात लोकप्रिय पद्धत):

बाळाला आपल्या छातीशी लावून त्याचे डोके तुमच्या खांद्यावर ठेवा. एका हाताने त्याला आधार द्या आणि दुसऱ्या हाताने त्याची पाठ हलक्या हाताने थोपटा. थोडे चालल्यानेही बाळाला लवकर ढेकर येते.

2. मांडीवर बसवून ढेकर देणे:

बाळाला तुमच्या मांडीवर बसवा, त्याचे तोंड तुमच्या विरुद्ध दिशेला असू द्या. एका हाताने त्याच्या छातीला आणि हनुवटीला आधार द्या (लक्षात ठेवा, मानेवर जास्त दाब पडू नये). दुसऱ्या हाताने हळूवारपणे त्याची पाठ चोळा किंवा थोपटा.

advertisement

3. पोटावर झोपवून ढेकर देणे:

बाळाला तुमच्या मांडीवर पालथे (पोटावर) झोपवा. एका हाताने त्याचे डोके पोटापेक्षा थोडे वरच्या बाजूला धरा आणि दुसऱ्या हाताने पाठ थोपटा. काही मिनिटांतच बाळ ढेकर देते.

जर ढेकर आली नाही तर काय करावे?

अनेकदा प्रयत्न करूनही बाळ ढेकर देत नाही. अशा वेळी घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही बाळाला पाठीवर झोपवून त्याच्या पोटाची हलकी मालिश करू शकता. तसेच त्याचे पाय सायकल चालवल्याप्रमाणे हळूहळू हलवा. या सायकलिंग व्यायामामुळे पोटात अडकलेली हवा नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास मदत होते.

advertisement

ढेकर देताना बाळ कधीकधी थोडे दूध बाहेर काढते, हे अगदी सामान्य आहे. त्यामुळे खांद्यावर नेहमी एक स्वच्छ सुती कापड ठेवा, जेणेकरून तुमचे कपडे खराब होणार नाहीत.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

जर ढेकर देऊनही बाळ सतत रडत असेल, त्याचे पोट खूप कडक लागत असेल किंवा त्याला वारंवार उलट्या होत असतील, तर याकडे दुर्लक्ष करू नका. अशा परिस्थितीत बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Baby : बाळाला दूध पाजल्यानंतर ढेकर देणं गरजेचं का असतं? अनेकांना माहित नाही यामागचं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल