1) लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा कीबोर्ड बघितला असता त्यातील अक्षरं योग्य क्रमाने म्हणजे त्या भाषेच्या वर्णमालेप्रमाणे नसल्याचं आपल्या लक्षात येतं. कीबोर्डमध्ये A या अक्षरानंतर S लिहिलेला असतो. सर्वांत वर Q असतो तर B आणि V एकमेकांच्या शेजारी असतात.
2) कीबोर्डवरील अक्षरं इंग्रजी वर्णमालेप्रमाणे A,B,C,D च्या क्रमात का नसतात? टायपिंगमध्ये अक्षरं उलटी-सुलटी असण्याची गरज आहे का? असे प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतात.
advertisement
3) सध्या कीबोर्डमध्ये वापरल्या जाणाऱ्या फॉरमॅटला 'QWERTY फॉरमॅट' म्हणतात. प्रत्येक कीवर (बटण) एक इंग्रजी अक्षर लिहिलेलं आहे. या विशिष्ट स्वरूपाचे अनुसरण करून अक्षरं एक सलग लिहिली जात नाहीत.
Knowledge : भारताचं राष्ट्रीय फूल कमळ आहे, मग पाकिस्तानचं काय? नाव ऐकून येईल हसू
4) A ते Z अक्षरं कुठे लिहिली आहेत, हे लक्षात ठेवावं लागतं. त्यासाठी टायपिंग शिकावं लागतं. जर A, B, C, D या क्रमाने लिहिल्यास टाईप करणं सोयीचं होईल का? असाही प्रश्न अनेकांना पडतो.
5) कीबोर्डवर वापरलेला QWERTY फॉरमॅट अनेक दशकांपासून वापरात आहे. कॉम्प्युटरच्या जन्माच्या खूप आधी हा फॉरमॅट अस्तित्वात आला आहे. टाईपरायटरच्या युगात या फॉरमॅटला सुरुवात झालेली आहे.
6) ख्रिस्तोफर लॅथम शोल्स यांनी टाईपरायटरचा शोध लावला. त्यांनी A,B,C,D फॉरमॅटमध्ये पहिला कीबोर्ड तयार केला होता. जेव्हा टाईपरायटर मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले आणि फास्ट टायपिंग सुरू झालं तेव्हा या फॉरमॅटमधील अडचणी समोर आल्या.
7) एकच अक्षर वारंवार टाईप केल्याने टाईपरायटरची बटणं एकमेकांत अडकत होती, त्यामुळे फास्ट टायपिंग होत नव्हतं. टायपिंग करणं सोयीचं आणि सोपं व्हावं, यासाठी अक्षरांची वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये मांडणी करण्यात आली.
8) यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. 1870 च्या दशकात QWERTY फॉरमॅटला स्टँडर्ड फॉरमॅट म्हणून निवडलं गेलं. या फॉरमॅटमुळे टाईपरायटरची बटणं एकमेकांत अडकण्याची शक्यता फार कमी होते. आणि इतक्या वर्षांच्या सवयीमुळे सगळीकडे कॉम्प्युटरमध्येही हा टायपिंग फॉरमॅट स्वीकारला गेला.
