मित्र एकमेकांशी बराच वेळ बोलू शकतात पण बायको किंवा गर्लफ्रेंडशी नाही. यामागे वैज्ञानिक कारण आहे. पहिलं म्हणजे याला फिक्स्ड इट सिंड्रोम म्हणतात. जिथे पुरूषांना समस्यांमध्ये गुंतवून ठेवण्याची सवय असते. विशेषतः भावनिक परिस्थितीमध्ये. जिथे महिला फक्त आपले मन मोकळे करतात तेव्हा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण जर त्यांना समस्या सापडली नाही तर ते मानसिकरित्या तपासतात.
advertisement
मॉलमध्ये फिरायला गेलं कपल, पण सुटला कंट्रोल; थेट टॉयलेटमध्ये गेले, 40 मिनिटांनी अशा अवस्थेत बाहेर
दुसरं म्हणजे सिक्स मिनिट रूल अभ्यासात दिसून आलं आहे, भावनिक संवादात पुरुष फक्त 6 मिनिटं गुंतून राहतात नंतर त्या संवादातून बाहेर पडतात. याबाबतीत पुरुष आणि महिलांच्या मेंदूतही फरक असतो. पुरुषांचा फ्रंटल कॉर्टेक्स लॉजिकल कारण आणि समस्या सोडवण्यासाठी कारणीभूत आहे तर महिलांची लिम्बिक सिस्टम भावनिक प्रतिक्रिया आणि भावनिक संबंधांसाठी कारणीभूत आहे. त्यामुळे महिला भावनिक आणि खोल संवादात गुंतून राहतात. तर पुरुष तितकं करू शकत नाही.
बाबो! बायकोला सोडण्यासाठी 42% पुरुषांनी घेतलं कर्ज, नेमकं प्रकरण काय?
त्यामुळे संवादात तुमचा जोडीदार तुमचं नीट ऐकत नाही आहे, तुमच्याकडे दुर्लक्ष करतो असं वाटत असेल याचा अर्थ त्यांना तुमची काळजी नाही असं नाही. एकमेकांशी बोलून त्यामागील कारण समजून ही समस्या सोडवा, असा सल्ला डॉ. रोहिणी पाटील यांनी दिला आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.