मॉलमध्ये फिरायला गेलं कपल, पण सुटला कंट्रोल; थेट टॉयलेटमध्ये गेले, 40 मिनिटांनी अशा अवस्थेत बाहेर

Last Updated:

Couple romance in mall toilet : एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे मॉलमध्ये फिरायला गेले आणि सार्वजनिक टॉयलेटमध्ये रोमान्स करू लागले. 

News18
News18
नवी दिल्ली : कपल म्हटलं की बीच, गार्डन आणि मॉलमध्ये फिरणं आलंच. बीच, गार्डनमध्ये तर लपूनछपून काही कपल्सना रोमान्स करताना पाहिलं असेल. पण एक असं कपल ज्यांचा मॉलमध्येही स्वतःवर ताबा राहिला नाही. मॉलमध्ये फिरायला गेलेलं हे कपल ज्यांचा स्वत:वरील कंट्रोल सुटला. त्यानंतर दोघंही तिथल्या बाथरूममध्ये गेले. तब्बल 40 मिनिटांनी ते बाहेर आले.
मलेशियातील हे प्रकरण आहे. एका प्रसिद्ध मॉलच्या कॅफेमध्ये हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं.हे कपल एकमेकांना भेटायला मॉलमध्ये आले. ते विद्यार्थीच वाटत होते. ते एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांचा स्वतःवरील ताबा सुटला. ते बाथरूममध्ये गेले आणि त्यांनी दरवाजा बंद करून घेतला.
advertisement
बाहेर काही लोक बाथरूममध्ये जाण्यासाठी वाट पाहत होते. पण बराच वेळ कुणी बाहेर येईना, 40 मिनिटं झाली कुणी दारच उघडत नव्हतं. शेवटी एका व्यक्तीने बाथरूमच्या दरवाजाखाली असलेल्या फटीतून डोकावून पाहिलं तर त्याला दोघांचे पाय दिसले. एक मुलाचा आणि एक मुलीचा. काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने मॉलच्या सुरक्षारक्षकांना तात्काळ बोलावण्यात आलं.
advertisement
सुरक्षारक्षकाने सुरुवातीला दार ठोठावलं. पण प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर दार जबरदस्तीने तोडण्यात आलं. आत असलेल्या जोडप्याला पाहून सुरक्षारक्षक संतप्त झाला. त्याने त्या जोडप्याला काठीने मारलंही. जोडप्याला लाज वाटली आणि ते पळून गेलं.
कोणीतरी संपूर्ण दृश्य मोबाईलवर रेकॉर्ड केलं आणि इन्स्टाग्रामवर अपलोड केलं. कॅफेनेही त्यांचं पब्लिक सर्विस एनाउंसमेंट शेअर केलं, "शौचालयात 40 मिनिटे घालवणारं कपल, आम्हाला माहित आहे की तुम्ही कोण आहात. पुन्हा असं करू नका." हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्सकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
advertisement
उडत्या विमानात कपलचा रोमान्स
याआधी विमानातही सगळ्यांसमोर रोमान्स करणाऱ्या कपलचे फोटो व्हायरल झाला होते. फोटोत कपल दोन्ही सीटवर एकमेकांना मिठी मारून झोपल्याचं दिसतं. एकमेकांच्या अंगावर पाय टाकले आहेत. झोपल्यानंतर त्यांचे चाळे सुरू आहेत. विमानातीलच एका प्रवाशाने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार पूर्ण 4 तासांच्या विमान प्रवासात कपलचं हेच सुरू होतं.
काही प्रवाशांनी त्यांचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले. विमानात कपलने सर्वांसमोर केलेल्या कृत्याबाबत सर्वांनी संताप व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/Viral/
मॉलमध्ये फिरायला गेलं कपल, पण सुटला कंट्रोल; थेट टॉयलेटमध्ये गेले, 40 मिनिटांनी अशा अवस्थेत बाहेर
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement