TRENDING:

रिकाम्या खोलीत काही बोलताच आवाज का घुमतो? यामागे दडलंय 'हे' रंजक शास्त्र, 99 टक्के लोकांना हे माहित नाही

Last Updated:

Science : हा कोणताही चमत्कार नसून यामागे भौतिकशास्त्राचा (Physics) एक अतिशय साधा आणि रंजक सिद्धांत काम करतो. भिंती तुमच्या आवाजाला बाऊन्स कशा करतात आणि फर्निचर आल्यावर तो जादूचा प्रभाव कुठे गायब होतो? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कधी नवीन घरात प्रवेश करताना किंवा एखादा मोठा हॉल रिकामा असताना तुम्ही अनुभवलंय का, की आपण बोललेला प्रत्येक शब्द आपल्याला पुन्हा ऐकू येतो? आपण एक शब्द उच्चारतो आणि जणू भिंती तो शब्द आपल्याला परत ऐकवतात. अनेकदा लहान मुले अशा रिकाम्या खोलीत ओरडून स्वतःच्या आवाजाच्या प्रतिध्वनीचा आनंद घेतात, तर काही जणांना हा अनुभव थोडा गूढ किंवा भीतीदायक वाटू शकतो. पण तुम्हाला माहित आहे का, की जेव्हा याच खोलीत सोफा, पडदे, बेड आणि कपाटं येतात, तेव्हा हा आवाज घुमणं अचानक बंद होतं असं का?
AI Generated photo
AI Generated photo
advertisement

हा कोणताही चमत्कार नसून यामागे भौतिकशास्त्राचा (Physics) एक अतिशय साधा आणि रंजक सिद्धांत काम करतो. भिंती तुमच्या आवाजाला बाऊन्स कशा करतात आणि फर्निचर आल्यावर तो जादूचा प्रभाव कुठे गायब होतो? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया.

आवाजाचा तो बाऊन्स बॅक प्रवास

जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपल्या तोंडातून निघणारा आवाज हवेमध्ये लहरींच्या (Waves) स्वरूपात प्रवास करतो. एखाद्या रिकाम्या खोलीत या लहरींना अडवण्यासाठी काहीही नसते. त्यामुळे त्या थेट समोरच्या भिंतीवर, छतावर किंवा जमिनीवर आदळतात आणि तिथून परावर्तित होऊन (Reflect) पुन्हा आपल्या कानापर्यंत पोहोचतात. जेव्हा हा आवाज थोड्या वेळाने पुन्हा ऐकू येतो, तेव्हा त्याला आपण 'प्रतिध्वनी' किंवा 'इको' (Echo) म्हणतो.

advertisement

फर्निचर आल्यावर काय बदलतं?

तुम्ही कधी विचार केलाय का, की भरलेल्या खोलीत आवाज का घुमत नाही? याचे उत्तर आहे शोषण. जेव्हा खोलीत सोफा, पडदे, गालीचे किंवा पुस्तके असतात, तेव्हा या वस्तू आवाजाच्या लहरींना अडवतात आणि स्वतःमध्ये शोषूण घेतात. मऊ वस्तू आवाजाला परावर्तित करण्याऐवजी तो दाबून टाकतात. त्यामुळे आवाज भिंतीपर्यंत पोहोचतच नाही आणि आपल्याला आपली इको ऐकू येत नाही.

advertisement

17.2 मीटरचे गणित: विज्ञान काय सांगते?

विज्ञानानुसार, स्पष्ट इको ऐकण्यासाठी तुमच्यात आणि भिंतीमध्ये किमान 17.2 मीटर अंतर असणे आवश्यक आहे. याचं कारण असं की, मानवी मेंदूला दोन वेगवेगळ्या आवाजांमधील फरक ओळखण्यासाठी किमान 0.1 सेकंद वेळ लागतो. हवेत ध्वनीचा वेग साधारणपणे 344 मीटर प्रति सेकंद असतो. त्यामुळे आवाजाला भिंतीवर आदळून पुन्हा परत येण्यासाठी लागणारा वेळ आणि अंतराचे हे गणित 17.2 मीटरवर येऊन थांबते.

advertisement

जर अंतर यापेक्षा कमी असेल (जसे की छोट्या खोल्यांमध्ये) तर आवाजाचे परावर्तन इतक्या वेगाने होते की तो मूळ आवाजात मिसळतो. याला तांत्रिक भाषेत रेव्हरबरेशन असे म्हणतात.

रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये 'फोम' का असतो?

तुम्ही कधी रेकॉर्डिंग स्टुडिओ किंवा सिनेमा हॉलमध्ये गेला असाल, तर तिथे भिंतींवर विशिष्ट प्रकारचे फोमचे पॅड्स किंवा कापडी आवरण दिसले असेल. हे मुद्दाम लावले जाते जेणेकरून आवाजाचा 'इको' पूर्णपणे संपवली जावी. यामुळे रेकॉर्डिंग एकदम स्पष्ट आणि 'क्रिस्प' येते. जर तिथे फोम नसता, तर गायकाचा आवाज भिंतींना धडकून इतका घुमला असता की गाण्याचे शब्दच समजले नसते.

advertisement

डोंगरांमध्ये आणि गुहांमध्ये आवाजाची जादू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
169 वर्ष जुनी पुण्यातली बेकरी, अजितदादांनाही आवडला होता इथला 'हा' पदार्थ, दुबईतही होतो एक्सपोर्ट!
सर्व पहा

उंच डोंगर किंवा खोल गुहांमध्ये आपलाच आवाज आपल्याला का ऐकू येतो? कारण तिथे पृष्ठभाग खूप कडक असतो आणि अंतर खूप जास्त असते. जेव्हा तुम्ही तिथे नाव ओरडता, तेव्हा आवाजाला आदळून परत येण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. म्हणूनच निसर्गाच्या कुशीत 'इको पॉईंट'वर आपण आपल्याच नावाची साद पुन्हा पुन्हा ऐकू शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
रिकाम्या खोलीत काही बोलताच आवाज का घुमतो? यामागे दडलंय 'हे' रंजक शास्त्र, 99 टक्के लोकांना हे माहित नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल