टाचांना भेगा पडल्या असतील तर घरी काही उपायांनी भेगा भरुन यायला मदत होते. भेगाळलेल्या टाचा पूर्ववत करण्यासाठी, उपाय नियमित करणं आणि स्वच्छता राखणं आवश्यक आहे.
भेगा भरुन येण्यासाठी रात्री थोडं पाणी गरम करा. त्यात लिंबू पिळून शॅम्पू घाला. नंतर, या पाण्यात पाय दहा-पंधरा मिनिटं बुडवा. यामुळे टाचा मऊ होतील.
Yogasana : हिवाळ्यात करा ही योगासनं, लवचिकता वाढवा, फिट राहा
advertisement
आणखी काही टिप्सही उपयोगी ठरतील.
- रात्री व्हॅसलीन लावा आणि पायात मोजे घाला. यामुळे मॉईश्चर टिकून राहील.
- थंडीच्या काळात नेहमी मोजे किंवा चप्पल घाला. पायात काहीही न घालता चालल्यानंही पायांना भेगा पडू शकतात.
- नारळाचं तेल आणि कापूर लावल्यानंही टाचांच्या भेगा कमी होण्यास मदत होते.
- आंघोळीचा वेळ कमी करा. आंघोळीचा वेळ दहा-पंधरा मिनिटांपर्यंत मर्यादित करा.
- दररोज झोपण्यापूर्वी टाचांवर कोरफडीचा ताजा गरही लावू शकता.
Pimples : चेहऱ्यावरच्या मुरुमांचं करायचं काय ? नितळ त्वचेसाठी विंटर टिप्स
- कडुनिंबाची पानं कुस्करून पेस्ट तयार करा. या पेस्टमधे थोडी हळद घाला आणि मिक्स करा. रात्री टाचांना लावा आणि सुकू द्या. नंतर पाण्यानं धुवा. टाचा धुतल्यानंतर, क्रिम तळव्यांना लावा आणि मोजे घाला. पायांना मालिश करा. या मालिशमुळे टाचांमधील भेगा कमी होण्यास मदत होते. नारळ, बदाम आणि ऑलिव्ह ऑइल सारखी विविध तेल वापरू शकता. हे उपाय शारीरिक म्हणजे भेगांना तसंच मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
भेगा कमी करण्यासाठी, स्क्रब हा देखील चांगला उपाय आहे. यासाठी एक पॅक तुम्ही घरी देखील बनवू शकता.
तांदळाच्या पिठात अर्ध्या लिंबाचा रस घालून पॅक बनवा. यामुळे टाचांना भेगा पडण्याचं प्रमाण कमी होईल.
