अंगात स्टिफनेस जाणवत असेल तर त्यावर योगासनं करणं हा चांगला उपाय आहे. हिवाळ्यात अंग दुखणं, अंगात ताठरपणा जाणवण्याचं प्रमाण अधिकच वाढतं. यामुळे हालचाल करणं कठीण होतंच, शिवाय ताणही वाढतो. नियमितपणे काही आसनांचा सराव करून, हा त्रास कमी करू शकता आणि लवचिकता वाढवू शकता.
लवचिकता वाढवण्यासाठी काही खास योगासनांबद्दल जाणून घेऊया. या आसनांमुळे पाठीचा कणा वाकवण्यासाठी आणि पाठीचा कडकपणा कमी होण्यासाठी उपयोग होतो.
advertisement
Pimples : चेहऱ्यावरच्या मुरुमांचं करायचं काय ? नितळ त्वचेसाठी विंटर टिप्स
भुजंगासन - तळवे खांद्याखाली ठेवून पोटावर झोपा. श्वास आत घ्या आणि हळूहळू छाती वर उचला, नाभी जमिनीपासून दूर ठेवा. या स्थितीत अर्धा मिनिट थांबा, नेहमीसारखा श्वास घेत राहा. हे आसन पाठ, मान आणि खांद्याच्या स्नायूंना ताण देण्यासाठी उपयुक्त आहे, यामुळे कडकपणा कमी होतो.
हे आसन तणाव कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. पाठ, खांदे आणि मांड्यांमधील जडपणा कमी करण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे. गुडघ्यांवर बसा आणि दोन्ही टाचांवर हळूहळू वजन ठेवा. कपाळ जमिनीला स्पर्श करून आणि हात बाजूला ठेवून पुढे वाका. या आरामदायी स्थितीत तीन मिनिटं राहा आणि खोल श्वास घ्या. या आसनामुळे मज्जासंस्था शांत होते आणि संपूर्ण शरीराला आराम मिळतो.
या आसनामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता चांगली होते. गुडघे आणि तळहातांवर टेबलटॉप स्थितीत या. श्वास सोडा, पाठीचा कणा वरच्या दिशेनं गोल करा आणि श्वास आत घ्या, पोट खाली करा आणि छाती, डोकं वर करा.
या आसनामुळे पाठ, मान आणि खांद्यांवरचा कडकपणा कमी होतो आणि पचनसंस्था देखील सक्रिय होते.
Vitamin B12 : ठणठणीत प्रकृतीसाठी व्हिटॅमिन बी 12 का गरजेचं, जाणून घ्या सविस्तर
पश्चिमोत्तानासन - पाठीच्या स्नायूंना यामुळे चांगला ताण मिळतो. पाय समोर पसरवून बसा. श्वास घ्या आणि हात वर करा आणि श्वास सोडत पुढे वाकवा. हातांनी पायांची बोटं पकडण्याचा प्रयत्न करा. गुडघे सरळ ठेवा आणि ही स्थिती मिनिटभरासाठी धरून ठेवा. या आसनामुळे, पाठीच्या खालच्या भागातला जडपणा कमी होतो.
पद्मासन - हे आसन दिसायला सोपं दिसतं, पण कंबर आणि घोट्यांमधील जडपणा कमी करण्यासाठी ते खूप प्रभावी आहे. जमिनीवर पाय आडवं करून बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा. ज्ञान मुद्रेत हात गुडघ्यांवर ठेवा.
डोळे बंद करा आणि खोल श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करा. या स्थितीत पाच-दहा मिनिटं बसल्यानं कंबरेचा आणि गुडघ्याच्या सांध्यातील कडकपणा हळूहळू कमी होऊ शकतो.
आसन योग्य प्रकारे करण्यासाठी योग प्रशिक्षकांचा सल्ला अवश्य घ्या.
