TRENDING:

ठाणे जिंकण्यासाठी गणेश नाईक, बारामती जिंकण्यासाठी मुरलीधर मोहोळ, भाजपकडून निवडणूक प्रभारींची घोषणा

Last Updated:

Local Body Election: कायम निवडणुकीसाठी तयार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणूक जाहीर झाल्याच्या २४ तासाच्या आत विभागानुसार निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया अखेर सुरू झाली असून मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलेला असून कायम निवडणुकीसाठी तयार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने २४ तासाच्या आत विभागानुसार निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील सत्तेत असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात गणेश नाईक तर अजित पवार यांच्या बारामतीत मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देऊन भाजपने आगामी काळातील इरादे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत विरोधी पक्षासोबत जेवढा संघर्ष होईल तितकाच संघर्ष महायुतीतही होणार असल्याचे अटळ आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती करण्यात आली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जबाबदार वाटप करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारीपदी गणेश नाईकांची नियुक्ती करण्यात आली आहे तर बारामतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणूक प्रभारीपदी आशिष शेलार यांच्याकडे सलग दुसऱ्यांदा जबाबदारी देण्यात आली आहे.

advertisement

क्र. संघटनात्मक जिल्हा निवडणूक प्रमुख निवडणूक प्रभारी
1 सिंधुदुर्ग श्री. प्रमोद जठार श्री. नितेश राणे
2 रत्नागिरी उत्तर श्री. विनय नातू श्री. निरंजन डावखरे
3 रत्नागिरी दक्षिण श्री. अतुल काळसेकर
4 रायगड उत्तर श्री. रामशेठ ठाकूर श्री. प्रशांत ठाकूर
5 रायगड दक्षिण श्री. सतीश धारप
6 ठाणे शहर श्री. संजय केळकर
7 ठाणे ग्रामीण श्री. कपिल पाटील
8 भिवंडी श्री. महेश चौघुले
9 मीरा-भाईंदर श्री. नरेंद्र मेहता श्री. गणेश नाईक
10 नवी मुंबई श्री. संजीव नाईक
11 कल्याण श्री. नाना सूर्यवंशी
12 उल्हासनगर श्री. प्रदीप रामचंदानी
13 वसई-विरार श्री. राजन नाईक डॉ. हेमंत सावरा
14 पालघर श्री. बाबाजी काटोळे
15 मुरबाड श्री. विजय चौधरी श्रीमती रक्षा खडसे
16 धुळे शहर श्री. अनूप अग्रवाल श्री. जयकुमार रावल
17 धुळे ग्रामीण श्री. कुणाल पाटील
18 नाशिक शहर श्री. राहुल ढिकले
19 नाशिक उत्तर डॉ. राहुल आहेर श्री. गिरीश महाजन
20 नाशिक दक्षिण श्री. गिरीश पालवे
21 मालेगाव श्री. दादा जाधव
22 जळगाव शहर श्री. राजूमामा भोळे श्री. संजय सावकारे
23 जळगाव पूर्व (रावेर) श्री. नंदू महाजन
24 जळगाव पश्चिम श्री. मंगेश चव्हाण
25 अहिल्या नगर शहर श्री. विक्रम पाचपुते
26 अहिल्या नगर उत्तर श्रीमती स्नेहलता कोल्हे श्री. राधाकृष्ण विखे पाटील
27 अहिल्या नगर दक्षिण डॉ. सुजय विखे पाटील
28 पुणे शहर श्री. गणेश बिडकर
29 पुणे उत्तर (मावळ) श्री. महेश लांडगे श्री. मुरलीधर मोहोळ
30 पुणे दक्षिण (बारामती) श्री. राहुल कुल
31 पिंपरी चिंचवड श्री. शंकर जगताप
32 सोलापूर शहर श्री. रघुनाथ कुलकर्णी
33 सोलापूर पूर्व श्री. राम सातपुते श्री. जयकुमार गोरे
34 सोलापूर पश्चिम (माढा) श्री. सचिन कल्याणशेट्टी
35 सातारा श्री. धैर्यशील कदम श्री. शिवेंद्रराजे भोसले

advertisement

क्र. संघटनात्मक जिल्हा निवडणूक प्रमुख निवडणूक प्रभारी
36 कोल्हापूर शहर श्री.अमल महाडिक श्री.धनंजय महाडिक
37 कोल्हापूर पू.(हातकलंगले) श्री.सुरेश हळवणकर
38 कोल्हापूर प.(करवीर) श्री.महेश जाधव
39 सांगली शहर श्री.शेखर इनामदार श्री.सुरेश खाडे
40 सांगली ग्रामीण श्री.सत्यजीत देशमुख
41 बुलढाणा श्रीमती श्वेता महाले श्री.आकाश फुंडकर
42 खामगांव श्री.चैनसुख संचेती
43 अकोला शहर श्री.विजय अग्रवाल श्री.रणधीर सावरकर
44 अकोला ग्रामीण श्री.अमित कावरे
45 वाशिम श्री.राजू राजे पाटील श्री.अनुप धोत्रे
46 अमरावती शहर श्री.जयंत डेहनकर श्री.संजय कुटे
47 अमरावती ग्रा. (मोर्शी) डॉ.अनिल बोंडे
48 अमरावती ग्रा. (मेळघाट) डॉ.प्रविण पोटे पाटील
49 यवतमाळ श्री.नितीन भुतडा श्री.मदन येरावार
50 पुसद श्री.निलय नाईक
51 वर्धा श्री.रामदास तडस श्री.पंकज भोयर
52 नागपूर शहर श्री.संजय मेंढे श्री.प्रविण दटके
53 नागपूर ग्रा.(रामटेक) श्री.अरविंद गजभिये
54 नागपूर ग्रा. (काटोल) डॉ.राजीव पोद्दार
55 भंडारा श्री.प्रकाश बाळबुधे श्री.परिणय फुके
56 गोंदिया श्री.संजय पुरम श्री.गिरीश व्यास
57 गडचिरोली श्री.प्रशांत वाघरे श्री.बंटी भांगडिया
58 चंद्रपूर शहर श्री.किशोर जोरगेवार श्री.अशोक नेते
59 चंद्रपूर ग्रामीण श्री.देवराव भोंगले
60 नांदेड शहर डॉ.अजित गोपछडे श्री.अशोक चव्हाण
61 नांदेड उत्तर ॲड.श्रीजया चव्हाण
62 नांदेड दक्षिण श्री.राजेश पवार
63 परभणी शहर श्री.सुरेश वरपूडकर श्रीमती मेघना बोर्डीकर
64 परभणी ग्रामीण श्री.रामप्रसाद बोर्डीकर
65 हिंगोली श्री.तानाजी मुटकुळे श्री.अशोक उईके
66 जालना महानगर श्री.कैलास गोरंट्याल डॉ.भागवत कराड
67 जालना ग्रामीण श्री.सुरेश बनकर
68 छ.संभाजीनगर शहर श्री.समीर राजूरकर श्री.अतुल सावे
69 छ.संभाजीनगर उत्तर श्रीमती अनुराधा चव्हाण
70 छ.संभाजीनगर पश्चिम डॉ. प्रशांत बंब श्री.पंकज मुंडे
71 बीड श्री.सुरेश सस
72 लातूर शहर श्रीमती अर्चना पाटील चाकूरकर श्री.संभाजी पाटील निलंगेकर
73 लातूर ग्रामीण श्री.अभिमन्यू पवार
74 धाराशिव श्री.सुजितसिंह ठाकूर श्री.राणा जगजितसिंह पाटील
75 मुंबई श्री.आशिष शेलार

advertisement

माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्था जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे.@RaviDadaChavan #BJP #Maharashtra pic.twitter.com/vpPv6F5izI

advertisement

निवडणूक कार्यक्रम जाहीर, २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पोटासाठी किती दिवस रस्त्यावर नाचायचं? डोळ्यात पाणी आणणारा VIDEO
सर्व पहा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी अखेरीस पूर्ण करण्याचे बंधन असल्याने निवडणूक आयोगाने त्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली. मतदार याद्यांमधील घोळ पूर्णपणे मिटवला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका राज्यातील विरोधी पक्षाने घेतलेली आहे. मात्र विरोधकांच्या आपेक्षानंतरही राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. २ डिसेंबरला मतदान होईल तर ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडेल.

मराठी बातम्या/Local Body Elections/
ठाणे जिंकण्यासाठी गणेश नाईक, बारामती जिंकण्यासाठी मुरलीधर मोहोळ, भाजपकडून निवडणूक प्रभारींची घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल