TRENDING:

Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात मोठी तेजी, तुरीने ओलांडला 9 हजाराचा टप्पा, कापसाला काय मिळाला भाव?

Last Updated:

राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. कापूस, सोयाबीन, तूर आणि कांदा ही राज्यातील शेतकरी पिकवत असलेली प्रमुख पिके आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. कापूस, सोयाबीन, तूर आणि कांदा ही राज्यातील शेतकरी पिकवत असलेली प्रमुख पिके आहेत. या पिकांची गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी आवक किती झाली, दर कसे राहिले याबाबत पाहुयात.
advertisement

राज्यात सर्वाधिक 7031 क्विंटल कापसाची आवक हिंगणघाट बाजार समितीत झाली. तर सर्वात जास्त 8138 रुपयांचा भाव अकोला बोरगाव मंजू या बाजार समितीत मिळाला. राज्यातील कापसाचे दर स्थिर आहेत.

राज्यात सर्वाधिक 11 हजार क्विंटल सोयाबीनची आवक लातूर बाजार समितीत झाली. तर सर्वात जास्त 6690 रुपये एवढा विक्रमी दर मिळाला. सोयाबीन दरात मागील काही दिवसांत तेजी आली आहे. सोयाबीनला सरासरी 5500 रुपये दर मिळत आहे.

advertisement

APMC Market: हळदीला मिळाला उच्चांकी दर, आले आणि डाळिंबाची काय स्थिती? इथं चेक करा

View More

राज्यातील सर्वच बाजारात तुरीच्या दरात तेजी पहायला मिळत आहे. राज्यात सर्वाधिक 9003 रुपये क्विंटल दर हिंगणघाट बाजार समितीत मिळाला. तर राज्यातील सर्वाधिक तुरीची आवक जालना बाजार समितीत 7089 क्विंटल इतकी झाली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इंजिनिअर सुद्धा फेल, बनवला असा टेबल की 12 प्रकारे येईल वापरता! वर्षाला 50 लाखांचा बिझनेस!
सर्व पहा

कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे दर देखील कमीच आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक 41000 क्विंटल कांद्याची आवक झाली. इथे कांद्याला कमीत कमी 100 तर जास्तीत जास्त 2100 रुपये दर मिळाला. तर राज्यात सर्वाधिक 2500 रुपये क्विंटल दर कामठी बाजार समितीत मिळाला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात मोठी तेजी, तुरीने ओलांडला 9 हजाराचा टप्पा, कापसाला काय मिळाला भाव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल