चिपळूणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना विश्वासात न घेता नगरपरिषदेसाठी उमेदवार ठरवण्यात आला होता. त्यामुळे भास्कर जाधव यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शिवसेनेने उमेदवार निवडताना विश्वासात न घेतल्यानेच भास्कर जाधव यांनी अधिकृत उमेदवारांचा मी प्रचार करणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली आहे. एबी फॉर्म कोणाला दिले याची मला माहितीच नसल्याने ही भूमिका घेतल्याचे भास्कर जाधव यांनी पुढे स्पष्ट केले आहे.
advertisement
तसेच या प्रकरणा शिवसेना उबीटीचे उमेदवार राजू देऊळेकर यांनी विनायक राऊत यांच्या आदेशावर फॉर्म भरल्याची माहिती दिली होती.पण मला याची अजिबात कल्पना नव्हती, तसेच माझ्यावर पूर्ण जबाबदारी टाकायला हवी होती,असे विधान करून भास्कर जाधव यांनी अप्रत्यक्षरीत्या विनायक राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.
त्याचसोबत भास्कर जाधव आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एबी फॉर्म घेऊन उतरलेले राजू देवळेकर यांच्या विरोधात असलेल्या माजी आमदार रमेश कदम यांचा प्रचार करणार आहेत.त्यामुळे भास्कर जाधव यांच्या या भूमिकेमुळे चिपळूणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उभीफूट पडली आहे.त्यासोबत उद्धव ठाकरे गटाचा एबी फॉर्म घेतलेल्या राजू देऊळेकरांना धक्का बसला आहे.
दरम्यान आता राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे रमेश कदम आणि जाधव एकत्र रणांगणात आहेत. तसेच अजितदादा पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्यासह महत्त्वाची समीकरणे आहेत.त्यामुळे ते मदत देत असतील तर स्वागत करू असे देखील भास्कर जाधव यांनी सांगितले आहे.तसेच भास्कर जाधव यांच्या भूमिकेमुळे चिपळुण नगरपरिषदेत मोठा ट्विस्ट आला आहे.
