TRENDING:

Dharashiv Nagar Parishad : धाराशिवमध्ये भाजपची मोठी खेळी, शिवसेनेचा टप्प्यात कार्यक्रम, शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी

Last Updated:

धाराशिव नगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती फुटली आहे. तसेच या घटनेनंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Dharashiv Nagar Parishad
Dharashiv Nagar Parishad
advertisement

Dharashiv Nagar Parishad : बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : धाराशिव नगरपालिका निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने मोठी खेळी केली आहे. शिवसेने सोबत युती करत असल्याच सांगत थेट 17 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या घटनेने धाराशिव नगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती फुटली आहे. तसेच या घटनेनंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

advertisement

धाराशिव नगरपालिका निवडणुकीत सुरूवातीपासून भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्रितपणे निवडणुक लढवणार होते. या संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये तशा चर्चा देखील झाल्या होत्या. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याशी युती करू आम्हाला 17 जागा देण्याचं कबूलही केलं होतं. त्याचबरोबर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देखील दिला होता. मात्र आता भाजपने अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 17 उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याऐवजी आमच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुरुज साळुंखे यांनी केला आहे. या घटनेने शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत मोठा दगाफटका झाला आहे.

advertisement

आमदार राणा पाटील यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असून आम्हाला धोका दिला आहे ही बाब आम्ही वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देत उद्या सकाळी नगरपालिका निवडणुकीत कुठल्या अध्यक्षपदाला पाठिंबा द्यायचा का? स्वतंत्र लढायचं याबाबत भूमिका स्पष्ट करून असे शिवसेना नेत्याने सांगितले आहे.

advertisement

दरम्यान धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत फॉर्म काढून घेण्याच्या शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडली असून भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची युती संपुष्टात आली आहे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'परिस्थिती बरी नाही, जाऊ नको' मृत 'श्री'ची परिस्थिती ऐकून डोळ्यात येईल पाणी!
सर्व पहा

मराठी बातम्या/Local Body Elections/
Dharashiv Nagar Parishad : धाराशिवमध्ये भाजपची मोठी खेळी, शिवसेनेचा टप्प्यात कार्यक्रम, शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल