सातारा जिल्ह्यातील वाई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना नेते उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांनी त्याचा भाऊ प्रवीण शिंदे यांना उमेदवारी दिली होती. पण अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणाला विकास शिंदे यांनी त्यांचा भाऊ प्रवीण शिंदेला उमेदवारी मागे घेण्यास सांगितले होते. त्यामुळे कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी प्रसिद्धी पत्रक काढून उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा उमेदवारही गेला आणि त्याचं पदही गेलं होतं.
advertisement
दरम्यान या सगळ्या घडामोडींवर आता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. या कारवाईनंतर विकास शिंदे यांनी सातारा जिल्हाप्रमुख रणजीत भोसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.मला जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुख यांच्याकडून माझ्या भावाचा उमेदवारी अर्ज ठेवण्याबाबत कोणतीही सूचना मिळाली नाही त्यामुळेच शेवटच्या दोन मिनिटात एबी फॉर्म मागे घेतल्याचे विकास शिंदे यांनी सांगितले आहे.
जिल्हाप्रमुख रणजीत भोसले यांच्याबरोबर आणि संपर्कप्रमुखांबरोबर अनेक वेळा संपर्क करून देखील पक्षाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने मी तो अर्ज काढून घ्यायचा निर्णय घेतला. सातारा जिल्हा प्रमुख रणजीत भोसले यांच्यावर ही जबाबदारी होती परंतु वाई मध्ये आल्यावर आपल्या पक्षाशी कमी आणि इतर पक्षांची जास्त त्यांच्या गाठीभेटी होत होत्या.गेल्या अनेक महिन्यापासून जिल्हाप्रमुख रणजीत भोसले हे मला टार्गेट करत असल्याचा आणि माझ्या विरोधात बातम्या छापून आणल्या जात असल्याचा आरोप विकास शिंदे यांनी केला आहे.
सातत्याने कुरघोडे करणे,आमदारांचा विरोधात प्रचार करणे,शिवसेनेची एकही शाखा उभी करणे आणि निवडणुकीत पक्षाच्या झालेला नुकसानीला सर्वस्वी जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले जबाबदार असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.पण या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाला मोठा झटका बसला आहे.
