Nagar Panchayat Election : नितीन नांदुरकर,प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील नशिराबाद नंगरपंचायतीत भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. कारण नशिराबादमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीत फुटली आहे. यासोबत या निर्णयामुळे गिरीश महाजन यांना होमग्राऊंडवरच मोठं चॅलेंज निर्माण झालं आहे.त्यामुळे हे चॅलेंज आता गिरीश महाजन स्विकारून नगरपरिषद निवडणुकीत कशी लढत देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अचानक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या निर्णयामुळे महायुतीत फूट पडल्याची जोरदार चर्चा शहरभर रंगली होती. यासोबतच भाजप–शिवसेना युतीच्या उमेदवारांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी उद्या सर्व उमेदवार माघारी घेईल अशाही चर्चा उधाण आले होते.त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी महायुतीसोबत राहणार की स्वतंत्र लढणार? असा मोठा प्रश्न पडला होता. पण आज अखेर या चर्चांना पुर्णविराम देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाने गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसणार आहे.
नशिराबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश भाऊ चव्हाण हे आमचे उमेदवार राहतील. आणि इतर सर्व प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार निवडणूक लढतील. भाजप आणि शिवसेनेसोबत मैत्रीपुर्ण लढत होईल,असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊसाहेब पवार यांनी सांगितले आहे.
अर्ज माघारी घ्यायला आता शेवटचे काही तास उरले आहेत. आणि समोरून कोणतीही व्यक्ती आमच्याशी चर्चा करायची आला नाही. आणि जरी आला आणि आम्हाला माघार घ्यायला लावली तर चर्चा अशीच होईल की आता पहिला नगराध्यक्ष गणेश भाऊ चव्हाण होणार मग चर्चा पुढची,असा इशारा संजय पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या या निर्णयाने गिरीश महाजन यांना मोठं चॅलेंज निर्माण झालं आहे.कारण जळगावमधील नशिराबाद हा परिसर हा गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात येतो. त्यामुळे आता गिरीश महाजन राष्ट्रवादीच्या या खेळीनंतर काय डाव खेळतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान आता राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिल्याने महायुतीत मैत्रीपुर्ण लढत होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गणेश चव्हाण तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी योगेश पाटील आणि शिवसेना ठाकरे गटातून राजू कोटे मैदानात आहेत.त्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतलेल्या या निर्णयामुळे महायुतीमध्ये निर्माण झालेली फूट अजून अधिक गडद झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नशिराबाद नगरपरिषद निवडणूक आता अधिक चुरशीची आणि तापलेली होण्याचे सर्व संकेत आहेत. पक्षांमधील बदलणारी समीकरणे, शक्तीप्रदर्शन, आणि उमेदवारांमधील संघर्षामुळे येणारे काही दिवस नशिराबादमध्ये प्रचंड राजकीय रंगत आणणार इतके निश्चित!
