राजन पाटलांच्या सुनबाई नगराध्यक्षपदी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांधिक चर्चेत राहिलेली निवडणूक म्हणजे अनगर नगरपंचायतीची निवडणूक. कारण राष्ट्रवादीच्या उज्वला थिटे यांनी पोलीस संरक्षणात अर्ज भरला होता.पण इतकं करून देखील त्यांच्या अर्जात काही चुका आढळल्या होत्या. या चुकामुळे त्यांचा अर्ज बाद झाला होता.यासोबत दुसऱ्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माजी आमदार, भाजप नेते राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती.
advertisement
मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाचा विजय
चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र निवडणूक व्हायच्या आधीच आल्हाद कलोती यांचा विजय झाला आहे.कारण काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमील शेख, नथ्थू खडके आणि नामदेव खडके यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आल्हाद कलोती यांची बिनविरोध निवड झाली आहे.दरम्यान आल्हाद कलोती यांची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी फिल्डिंग लावल्याचं सांगितलं जातं. ही निवडणूक बिनविरोध होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून आमदार रवी राणा यांना शुभेच्छा दिल्या.
गिरीश महाजन यांची बायको बिनविरोध
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये मोठी घडामोड घडली आहे. जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधन महाजन मैदानात उरतल्या होत्या.त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रतिभा झाल्टे, काँग्रेसच्या रूपाली ललमानी आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचे आव्हान होते. पण ऐनवेळी प्रतिभा झाल्टे, रूपाली ललमानी आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराने माघार घेतल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध निवडून आल्या आहेत. या विजयामागे गिरीष महाजन यांनी मोठी खेळी असल्याची माहिती आहे.
जयकुमार रावल यांच्या 'मातोश्रीं'चा विजय
धुळे जिल्ह्यातील दोडाईचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत देखील मोठी घडामोड घडली आहे. या निवडणुकीत भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल मैदानात होत्या. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शरयू भवसार होत्या. पण शरयू भावसार यांचा अर्ज बाद करण्यात आल्याने नयनकुंवर रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान नगरपालिकेत थकबाकी असल्याचा आरोप करत शरयू भावसार यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. पण नगरपालिकेच्या दाखल्यात कोणतीही थकबाकी नसल्याचे स्पष्ट नमूद होते. सर्व कागदपत्रासह अर्ज दाखल करूनही तो बाद कसा झाला,असा प्रश्न करून अर्ज बाद करणे हे सत्तेच्या दबावाचे द्योतक आहे,असे शरयू भवसार यांनी म्हटले होते.
