TRENDING:

प्रतीक्षा संपली! दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? महत्त्वाची अपडेट समोर

Last Updated:

10th-12th Board Exam Result: दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबतची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: अलीकडेच दहावी बारावीची बोर्ड परीक्षा पार पडली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेला २१ लाख विद्यार्थी बसले होते. करियरला कलाटणी देणाऱ्या परीक्षा म्हणून दहावी बारावीच्या परीक्षांकडे पाहिलं जातं. कारण या परीक्षांच्या मार्क्सवरच पुढचं भवितव्य ठरत असता. त्यामुळे परीक्षा निकाल कधी लागणार यावरून विद्यार्थ्यांमध्ये कायमच धाकधूक असते. आता निकालाची प्रतीक्षा संपणार आहे. बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबाबतची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितुनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्‍या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मात्र नेमक्या कोणत्या तारखेला निकाल लागणार, याचं अधिकृत परिपत्रक अद्याप काढलं नाही. येत्या आठवडाभरात हे परिपत्रक काढलं जाईल आणि निकाल कधी लागणार ही तारीखही समोर येईल

advertisement

विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं होणार?

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेड देखील मिळतील. ग्रेडिंग सिस्टीमनुसार, ७५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे. ६० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल. ४५ टक्के ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. उत्तीर्ण होण्यासाठी ३५ पेक्षा जास्त गुण हवे. ज्या विद्यार्थ्यांना हे किमान गुणही मिळू शकणार नाहीत त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.

advertisement

कुठे पाहता येणार निकाल

mahahsscboard.in

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in

sscresult.mkcl.org

hsc.mahresults.org.in

निकाल कसा चेक कराल?

-सगळ्यात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.

-होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्याला क्लिक करा.

-क्लिक करताच नवीन विंडो ओपन होईल. त्याठिकाणी सीट नंबर आणि इतर माहिती भरुन ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.

advertisement

-त्यानंतर तुमचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

-हा निकाल डाऊनलोड करता येईल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रतीक्षा संपली! दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? महत्त्वाची अपडेट समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल