TRENDING:

Jalgaon: 'मी गेल्यावर ही माझी स्टोरी स्टेटसला टाका, सॉरी', 20 वर्षांच्या श्यामने सगळ्यांना रडवलं, प्राचार्यांमुळे...

Last Updated:

या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संबंधित प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव : जळगाव शहरातील देवकर फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याने प्राचार्यांनी कॉलेजमध्ये मित्रांसमोर पीव्हीसी पाईपाने मारहाण केल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संबंधित प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे.  श्याम प्रभाकर पाटील (वय २०) असं आत्महत्या केलेल्या वीस वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. श्याम पाटील हा जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी प्राचार्य योगेश पवार यांनी दोष नसताना पीव्हीसी पाईपने मारहाण करून शिक्षक आणि मित्रांसमोर अपमान केल्याची माहिती श्यामने आपल्या कुटुंबीयांना दिली होती.

advertisement

१४ फेब्रुवारी रोजी त्याने वडिलांना आणि काकांना फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगितलं होतं.  त्यानंतर नेहरूनगर येथील राहत्या खोलीवर त्यानं टोकाचं पाऊल उचललं. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून त्यात प्राचार्यांनी मारहाण केल्याचा उल्लेख आहे. मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्राचार्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

advertisement

दरम्यान, विद्यार्थ्यांची सुसाईड नोट आम्ही जप्त केली असून प्राचार्यविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. प्राचार्य योगेश पवार यांनी श्याम पाटील या विद्यार्थ्याला सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर अपशब्द वापरले शिवीगाळ केली होती, आणि त्यानंतर त्याने रूमवर आत्महत्या केल्याची माहिती रामानंद पोलिसांनी दिली. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

advertisement

श्याम पाटीलने सुसाईट नोटमध्ये काय लिहिलं? 

"माझी काही चूक नव्हती बाबा यामध्ये. यावेळेस मला आधी काही माहिती पण नव्हतं. खरंतर माझ्या मित्रांचं भांडण चालू होतं, त्यात मी पडलो आणि त्याच्यानंतर त्या एका मुलाने माझी कॉलर पकडली आणि मग मी त्याला एक कानशिलात लगावली. तो मुलगा बाहेरचा होता आणि मला भांडण करायचं नव्हतं, त्यासाठी मी प्रिन्सिपल सरांकडे गेलो होतो आणि सरांना मी हे सगळं सांगितलं.

advertisement

नंतर सरांनी मला खूप मारलं, खूपच... मला माहिती आहे गुरु मारतात, पण एवढं पण मारत नाहीत. पूर्ण टीचर स्टाफसमोर मला मारलं आणि तो मुलगा मुलं घेऊन आलेला होता, त्याला काहीच मारलं नाही. हे वास्तव आहे आणि मला खरं तर माझी प्रतिमा (image) महत्त्वाची होती. आधी पण माझी चूक नव्हती, तरी पण काही मुलांनी मिळून मला मारलं आणि ते झाल्यावर मी प्रिन्सिपल सरांना सांगितलं तर तेव्हा सरांनी का बरं नाही मारलं मग त्या मुलांना? तेव्हा कुठे गेली होती सरांची हिंमत? आणि त्या सरांनी मला शिव्या पण दिल्या. हे माझ्याकडून सहन होत नाहीये.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

आता मी गेल्यानंतर सीसीटीव्ही चेक करून बघा की मला किती मारलं होतं. प्रिन्सिपल सरांनी मला 'सॉरी' म्हणावं. बाबा, मम्मी, रामू, सिद्धू... त्यांना मी दुखावलं असेल तर त्यांना पण सॉरी. मी प्रत्येक वेळेस सर्व नीट करायचा प्रयत्न केला, पण सगळं माझ्यावरच उलटलं. सॉरी... आणि रामू, मी गेल्यावर ही माझी 'स्टोरी' स्टेटसला टाक. पुन्हा एकदा सर्वांना सॉरी."

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: 'मी गेल्यावर ही माझी स्टोरी स्टेटसला टाका, सॉरी', 20 वर्षांच्या श्यामने सगळ्यांना रडवलं, प्राचार्यांमुळे...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल