पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यात सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. डॉ. प्रशांत वसंत कांडेकर हे सायंकाळी सोनगावहून भेंडाळी रोडमार्गे सायखेड्यातील सिद्धीविनायक हॉस्पिटलकडे आपल्या ब्रिझा कारने जात होते. त्यावेळी आरोपी सागर कापसे, ऋतिक कापसे आणि साहिल पटेल हे तिघे दुचााकीवरून जात होते. तिघांनी कांडेकर यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर तिघांनी कांडेकर यांच्याशी वाद घातला आणि शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
advertisement
तिघांनी मारहाण केल्यामुळे डॉक्टर कांडेकर हे आपल्याा हॉस्पिटलकडे धावत गेले. पण या आरोपींपैकी एकाने दगड उचलून त्यांच्या पाठीत मारला. बाहेर गोंधळ सुरू असल्याचा पाहून कांडेकर यांच्या पत्नी धावत आल्या. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण या टोळक्याने त्यांच्याही हुज्जत घातली. एवढंच नाहीतर एकाने त्यांचा हात धरुून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलबाहेर हैदोस घातल्यानंतर या टोळक्याने 'मार डालेंगे' असं म्हणत डॉक्टर कांडेकर यांच्याकडे २० हजार रुपये मागितले.
स्थानिकांनी लोकांनी टोळक्याला पिटाळलं
कांडेकर यांच्या हॉस्पिटलबाहेर राडा सुरू असल्याचं पाहून स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले. लोकांनी विरोध केल्यानंतर टोळक्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं डॉक्टरांसाठी रस्त्यावर उतरले. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोनगाव–सायखेडा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच निफाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश गुरव आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गायकवाड यांनीही घटनास्थळी येत आंदोलकांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आकाश आणि ऋतिक कापसे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
